Lokmat Sakhi >Food > Food and Recipe: प्या गारेगार कोकोनट शेक! नारळपाणी पिऊन शहाळे फेकू नका, मलाईचा करा झकास वापर; बघा कुल रेसिपी

Food and Recipe: प्या गारेगार कोकोनट शेक! नारळपाणी पिऊन शहाळे फेकू नका, मलाईचा करा झकास वापर; बघा कुल रेसिपी

Food and Recipe: थंडगार कोकोनट शेक... नारळपाणी पिऊन झाल्यानंतर शहाळ्यात असणाऱ्या मलाईपासून (coconut shake from coconut malai) तयार होणारा हा एक मस्त पदार्थ.. उन्हाळ्यात तर अगदी आवर्जून केला पाहिजे असा...(summer special recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2022 12:54 PM2022-04-09T12:54:03+5:302022-04-09T12:54:47+5:30

Food and Recipe: थंडगार कोकोनट शेक... नारळपाणी पिऊन झाल्यानंतर शहाळ्यात असणाऱ्या मलाईपासून (coconut shake from coconut malai) तयार होणारा हा एक मस्त पदार्थ.. उन्हाळ्यात तर अगदी आवर्जून केला पाहिजे असा...(summer special recipe)

Summer Special Drink: How to make coconut shake? The best use of coconut malai, Must try recipe | Food and Recipe: प्या गारेगार कोकोनट शेक! नारळपाणी पिऊन शहाळे फेकू नका, मलाईचा करा झकास वापर; बघा कुल रेसिपी

Food and Recipe: प्या गारेगार कोकोनट शेक! नारळपाणी पिऊन शहाळे फेकू नका, मलाईचा करा झकास वापर; बघा कुल रेसिपी

Highlightsमलाईपासून एवढा चवदार शेक तयार होत असेल, याचा अंदाज तुम्हाला हा चिल्ड कोकोनट शेक (chilled coconut shake) चाखल्यानंतरच येऊ शकतो.

शहाळे दोन प्रकारचे. एक मलाईचे आणि दुसरे मलाई नसणारे. मलाई असणारे शहाळे आपण घेतले तरी चमच्याने कोरून जेवढी मलाई घेता येईल तेवढी घेतो आणि शहाळे फेकून देतो. अनेक जण तर मलाई न काढताच शहाळे फेकूनही देतात. पण शहाळ्यातलं पाणी जेवढं पौष्टिक आहे, तेवढीच आतली मलाईही आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळेच आजची ही खास रेसिपी... मलाईपासून एवढा चवदार शेक तयार होत असेल, याचा अंदाज तुम्हाला हा चिल्ड कोकोनट शेक (chilled coconut shake) चाखल्यानंतरच येऊ शकतो. उन्हाळ्यात पिण्यासाठी हे एक मस्त थंडगार पेय आहे..

 

नारळातील मलाई खाण्याचे फायदे (benefits of eating coconut malai)
- डिहायड्रेशनचा त्रास कमी करून एनर्जी देण्यासाठी नारळ पाण्याइतकीच नारळातील मलाईही अतिशय उपयुक्त आहे. त्याला कोकोनट मीट म्हणूनही ओळखले जाते.
- चयापचय क्रिया सुधारण्यासाठी मलाई उपयुक्त ठरते.
- मलाईमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे पचनाच्या विविध समस्या असणाऱ्यांनी नारळाची मलाई नियमित खावी. 
- कॅलरीज, व्हिटॅमिन्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
- केस, त्वचा आणि डोळ्यांसाठी मलाई खाणे चांगले आहे.

 

कसा करायचा कोकोनट शेक (How to make coconut shake?)
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या spoonsofdilli या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
- सगळ्यात आधी चमच्याने शहाळ्यातील मलाई काढून घ्या.
- अर्धा कप मलाई असल्यास एक कप दूध, एक टेबल स्पून दूध, चिमुटभर विलायची पावडर, अर्धा कप नारळाचं पाणी, व्हॅनिला आईस्क्रिमचे दोन स्कूप, दोन- तीन आईस क्युब हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाका आणि त्याचा व्यवस्थित शेक करून घ्या..
- आता हा शेक रिकाम्या शहाळ्यात टाका. त्यावर व्हॅनिला आईस्क्रिमचा आणखी एक स्कूप टाक. त्यावर काजू, बदाम किंवा तुम्हाला आवडणाऱ्या इतर सुकामेव्याचे काप टाका. त्यामध्ये एक मस्त स्ट्रॉ टाका आणि उन्हाळ्याच्या या गरमीत मस्त थंडगार कोकोनट शेक पिण्याचा आनंद लूटा.. 


 

Web Title: Summer Special Drink: How to make coconut shake? The best use of coconut malai, Must try recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.