उन्हाळ्यांत मस्त, छान थंडगार लस्सीचा ग्लास कुणी हातात दिला तर नको असं कुणीच म्हणणार नाही. या ऋतूंत वाढत्या उष्णतेमुळे आपल्याला सतत काही ना काही थंडगार खाण्या - पिण्याची इच्छा होतेच. उन्हाळ्यात आपण थंडगार ताक, लस्सी, लिंबूपाणी, कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी अशा पेयांवर (Summer Special Drink Mango Lassi) यथेच्छ ताव मारतो. उन्हाळ्यात (How To Make Mango Lassi At Home) या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय उन्हाळ्याची मजा पुर्ण झाल्यासारखी वाटतच नाही(Mango Lassi Recipe).
एरवी आपण नेहमीचीच दह्याची प्लेन लस्सी पितो. परंत्तू उन्हाळा म्हटल्यावर आंब्याचा सिझन, आणि आंब्याच्या सिझनमध्ये मँगो लस्सीचा थंडगार बेत झाला नाही, असं होऊच शकणार नाही. आंबा खाणं किंवा लस्सी पिणं आपण एरवी करतोच परंतु रणरणत्या उन्हांत आंब्याची लस्सी म्हणजे सुख... यंदाच्या उन्हाळ्यात तुम्ही देखील मँगो लस्सीचा बेत करणार असाल तर लस्सी बनविण्याची यापेक्षा सोपी पद्धत दुसरी कदाचित नसेलच.. ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला फक्त चारचं पदार्थ लागणार आहेत.
साहित्य :-
१. आंब्याच्या पल्प - २ (मध्यम आंब्यांचा पल्प)
२. दही - १ + १/२ कप
३. साखर - ३ टेबलस्पून
४. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
५. बर्फाचे खडे - ५ ते ६ खडे
६. ड्रायफ्रुटसचे काप - २ ते ३ टेबलस्पून
शहाळ्याच्या पाण्यांत मिसळा ४ पदार्थ, पाण्याचे पोषणमूल्य वाढेल दुपटीने - उन्हाळ्यातही राहा फिट!
कृती :-
१. सगळ्यात आधी मस्त, छान पिकलेले आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर, आंबे कापून त्यातील गर एका बाऊलमध्ये काढून घ्यावा.
२. आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात छान घट्ट, दाटसर दही घालावे, त्यानंतर त्यात आंब्याचा काढून घेतलेला गर, चवीनुसार साखर, वेलची पूड घालावी.
दुधाला विरजण म्हणून लावा ‘हे’ ३ पदार्थ, कुणाकडे विरजण मागायची गरज नाही! परफेक्ट दह्यासाठी उपयुक्त...
३. मिक्सरच्या भांड्यात हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावेत.
४. आता एका ग्लासात मिक्सरमधील ही तयार लस्सी काढून घ्यावी. त्यावर ड्रायफ्रुट्सचे बारीक काप किंवा तुकडे घालावेत. आपल्या आवडीनुसार आपण बर्फाचे खडे देखील घालू शकतो.
मस्त गोड चवीची छान दाटसर, घट्ट लस्सी पिण्यासाठी तयार आहे.