उन्हाळ्यात बऱ्याचदा असं होतं की अजिबात जेवावं वाटत नाही. जेवणाऐवजी ताक, ज्यूस किंवा वेगवेगळी सरबतं प्यावीशी वाटतात. तसंही घामामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी कमी होते. त्यामुळे भरपूर लिक्विड पोटात जाण्याची गरज असतेच. त्यामुळेच तर उन्हाळ्यात आपली पारंपरिक सरबतं भरपूर प्या, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यासाठीच तर घ्या या दोन खास रेसिपी.. पारंपरिक सरबतांना द्या थोडासा हटके ट्विस्ट.. यंदा करूनच बघा आवळ्याचं (aamla cooler) आणि काकडीचं सरबत (cucumber cooler).. चवीत होणारा बदलही नक्कीच तुम्हाला आवडेल. या दोन्ही रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आल्या आहेत.
आवळा कुलर रेसिपी (aamla cooler recipe in marathi)- आवळा कुलर म्हणजेच आवळ्याचं सरबत कसं करायचं याची रेसिपी सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर (Sanjeev Kapoor) यांनी त्यांच्या sanjeevkapoor या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. अतिशय झटपट आणि कमीतकमी गोष्टींमध्ये तयार होणारं हे सरबत करण्यासाठी आपल्याला आवळ्याचा रस, मीठ, मध आणि थंडगार पाणी एवढंच लागणार आहे.- आवळा सरबत करण्यासाठी आवळ्याच्या बिया काढून ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याचा रस काढा.- एका ग्लासमध्ये २ ते ३ टेबलस्पून आवळ्याचा रस, १ ते दिड टेबलस्पून मध आणि चिमुटभर मीठ टाका.- काळे मीठ, जीरेपूड, चाट मसाला यांचाही वापर आपण आवडीनुसार करू शकतो.- आता त्या ग्लासमध्ये थंडगार पाणी घाला. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की तयार झालं गारेगार आवळा कुलर..
काकडी कुलर रेसिपी..- ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या mydelishbowl या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. - काकडी कुलर करण्यासाठी एक काकडी, अर्ध्या लिंबाचा रस, मिरेपूड, चवीनुसार मीठ आणि साखर, चाट मसाला, पुदिन्याची ८ ते १० पाने एवढं साहित्य लागेल.- सगळ्यात आधी काकडीचे सालं काढून घ्या आणि तिच्या बारीक फोडी करा.- काकडीच्या फोडी, पुदिना मिक्सरमध्ये टाका आणि त्याची बारीक पेस्ट करा.- ही पेस्ट गाळून घ्या. आता त्यामध्ये दोन ग्लास पाणी, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, चाट मसाला, मिरेपूड टाका.- लिंबू पिळल्यानंतर सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. थंडगार काकडी कुलर तयार.