उन्हाळा सुरु झाल्यानंतर घरात पापड, कुरडई, लोणचं हे पदार्थ बनवण्याची लगबग सुरु होते. घरातील कामं आवरून महिलावर्ग हे पदार्थ बनवतात. उन्हाळ्यात तयार करण्यात येणारे पदार्थ वर्षभर टिकतात. अनेकांना कुरडई हा पदार्थ खूप आवडतो. पण कुरडई बनवणे सोपी गोष्ट नाही. कुरडई बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
चिक काढून, त्यात इतर साहित्य मिसळून, गरम - गरम साच्यात भरून कुरडई बनवावी लागते. कुरडई बनवण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. पण आपण रव्याचे देखील कुरडई बनवू शकता. रव्याचे इन्स्टंट कुरडई कमी साहित्यात झटपट बनते. यासह वर्षभर टिकते. तळून झाल्यानंतर हे कुरडई चौपटीने फुलते. चला तर मग या झटपट पदार्थाची कृती पाहूयात(Summer special Easy Rava Kurdai).
रव्याचे इन्स्टंट कुरडई बनवण्यासाठी लागणारं साहित्य
अर्धा किलो रवा
पाणी
मीठ
तेल
परफेक्ट साऊथ इंडियन ‘कोकोनट चटणी‘ करण्याची रेसिपी, उडपीस्टाइल नारळ चटणी करा घरच्याघरी
अशी बनवा रव्याचे इन्स्टंट कुरडई
सर्वप्रथम, अर्धा किलो रवा, तीन ते चार वेळा पाण्यातून धुवून काढा. रवा धुवून झाल्यानंतर त्यात दुप्पट पाणी घालून ३ दिवसांसाठी भिजत ठेवा. भिजत ठेवताना याचे पाणी रोज बदलत राहा. चौथ्या दिवशी त्यातून अतिरिक्त पाणी काढून घ्या, पाणी काढून झाल्यानंतर जेवढा रवा आहे, तेवढंच पाणी एका कढईत गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात मीठ टाका, व कपभर पाणी बाजूला काढून ठेवा. आता रव्याचा तयार चिक घालून चमच्याने मिश्रण ढवळत राहा.
आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा..
त्यावर झाकण ठेऊन १० मिनिटांसाठी वाफ द्या. १० मिनिटानंतर चिक शिजला आहे की नाही हे चेक करा. आता कुरडईच्या साच्यात मिश्रण भरून कुरडई एका प्लास्टिकच्या पेपरवर पाडून घ्या. प्लास्टिकच्या पेपरला तेलाने ग्रीस करायला विसरू नका. हे कुरडई दोन ते तीन दिवसांसाठी कडक उन्हात सुकवून घ्या. अशा प्रकारे रव्याचे इन्स्टंट कुरडई रेडी. हे कुरडई तळल्यानंतर चौपटीने फुलतात.