उन्हाळा जवळ आला आहे. आता रत्यावर सोडावाले दिसायला लागतील. कुल्फी लेलो हा आवाज सतत कानात वाजत राहील. (Summer Special Guava Ice-Cream , Easy Recipe )पॉट आइस्क्रिमच्या गाड्या जागोजागी लागतील. तसेच ताकाचे माठ घेऊन विक्रेते रस्त्याच्याकडेला दिसायला लागतील. असे गारेगार पदार्थ आपण ताव मारून खाणार आणि मग आजारी पडणार. त्या अन्नावर रत्यावरची धूळ बसलेली असते. (Summer Special Guava Ice-Cream , Easy Recipe )तसेच कोणतेही पाणी वापरून पदार्थ तयार केला जातो.
मग मस्त गार आइस्क्रिम खायचंच नाही का खायचं ना पण घरी तयार करून खा. तुम्हाला माहिती आहे का की घरी आइस्क्रिम तयार करणं फार सोपं आहे. (Summer Special Guava Ice-Cream , Easy Recipe )अनेक विध प्रकारचे आइस्क्रिम घरी तयार करता येते. त्यामध्ये एक प्रकार म्हणजे फ्रुट आइस्क्रिम. आवडत्या फळांपासून मस्त आइस्क्रिम तयार करायचे. असे एक पेरुचे आइस्क्रिम तयार कसे करायचे हे शेफ नेहा शाह हिने सांगितले आहे. तर मग तुम्हीही खाऊन बघा.
साहित्य
पेरू, मिल्क पावडर, फ्रेश क्रिम, साखर, लाल तिखट, मीठ
सगळं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. पेरु किती वापरता त्या अनुसार इतर पदार्थ वापरा.
कृती
१. मोठ्या आकाराचे पेरु वापरा. पेरुचे देठाच्या बाजूने कापून घ्या. त्याच्या आतील सगळा पेरुचा गर काढून घ्या. आणि पेरु तसाच गोल आकारात ठेवा.
२. एका मिक्सरच्या भांड्यात मिल्क पावडर घ्या. तुम्ही जेवढे पेरू वापरताय त्यानुसार प्रमाण ठरवा. त्यात फ्रेश क्रिम घाला. साखरही घाला. काढून घेतलेला पेरुचा गर त्यात घाला.
३. सगळ्याची मस्त पेस्ट करून घ्या. पूर्ण मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा.
४. आता ते मिश्रण पेरुमध्ये ओता आणि मग ते फ्रिजमध्ये ठेवा. व्यवस्थित घट्ट झाल्यावर पेरु कापून घ्या. नेहमी जसे तुकडे करता तसेच. त्यावर लाल तिखट आणि मीठ लावा.
५. अति कडक होईपर्यंत ठेऊ नका. कारण मग तो कापता येणार नाही. तसेच त्याचा बर्फ होऊन जाईल. थोडा मऊ असतानाच खा.