Join us  

पेरु खा-पेरु प्या! उन्हाळ्यात पेरुचं गारेगार सरबत पिण्याचे ३ फायदे, पाहा रेसिपी-व्हा फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 3:56 PM

Summer Special Guava juice recipe : पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे इम्यूनिटी वाढवण्यासाठी उत्तम असते. 

उन्हाळ्यात काही थंड पिण्याची किंवा खाण्याची इच्छा सर्वांचीच होते. कारण उष्णतेमुळे सतत घसा कोरडा पडतो आणि काहीतरी खाण्याची इच्छा होते. कलिंगड, नारळपाणी, ऊसाचा रस या हंगामात मोठ्या प्रमाणात प्यायला जातो.  बाजारात हिरवेगार फ्रेश पेरू कमीत कमी किमतीत उपलब्ध आहेत. तिखट मीठ लावून पेरू खाणं अनेकांना आवडतं. हेच पेरू वापरून तुम्ही छान सरबत बनवू शकता तेही घरच्याघरी. पेरूचं सरबत बनवायला सोपं आणि चवीला अतिशय स्वादीष्ट, रिफ्रेशिंग आहे. (3 benefits of drinking guava juice in summer)

पेरूचं सरबत पिण्याचे फायदे

१) इतर फळांच्या तुलनेत  पेरूमध्ये सर्वाधिक फायबर असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यास मदत करू शकते. त्यामुळे पेरूचं सरबत प्यायल्यास पचनक्रीया चांगली राहण्यास मदत होईल.

२) पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे इम्यूनिटी वाढवण्यासाठी उत्तम असते. 

३) वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात पेरूच्या सरबताचा समावेश करू शकता. पेरूला प्रथिने, जीवनसत्व आणि फायबर गुणधर्मांनी परिपूर्ण म्हणून ओळखले जाते. पेरू चयापचय नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशलआरोग्य