Lokmat Sakhi >Food > आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

पॅनकेक करणं एकदम सोपं, करायला झटपट आणि खायलाही मस्त. (How to make a pancake)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 01:23 PM2022-04-23T13:23:36+5:302022-04-23T13:30:46+5:30

पॅनकेक करणं एकदम सोपं, करायला झटपट आणि खायलाही मस्त. (How to make a pancake)

Summer Special : How to make a pancake, make perfect desi- eggless nutritious pancakes at home | आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

Highlightsसध्या आंबा उपलब्ध असल्याने तो यावर घालून अफलातून लागते.

शुभा प्रभू साटम

सुटी सुरू झाली की घरोघरी एकच आवाज कानावर पडतात, काहीतरी वेगळं कर, काहीतरी भारी कर. आता आईच नाही तर काही बाबाही किचनमध्ये जाऊन मस्त पदार्थ करतात. अनेकदा मुलंही यू ट्यूब पाहून आपापल्या आवडीचे पदार्थ करतात. तरी यासाऱ्यात आईच्या मागचा काहीतरी भारी आणि वेगळं कर हा लकडा संपत नाही. त्यात उन्हाळ्यात किचनमध्ये गॅसजवळ उभं राहू नये असं वाटतं इतकं उकडतं. स्वयंपाक करावासा वाटत नाही. पण करावा तर लागतोच. तर अशावेळी झटपट होईल, नाश्त्याला, सायंकाळी चहासोबत किंवा चवबदल म्हणूनही करता येतील हे पॅनकेक. (How to make a pancake)
 म्हणजे फिरंगी धिरडी, धिरडी म्हटलं की नाक मुरडलं जाते पण नाव बदललं की चवीने खातात सगळे. आणि मुळात हे पॅककेक लागतात छान, आपल्याला पौष्टिक आणि अगदी देसी स्टाइलनेही करता येतात.


(Image : Google)

पॅनकेकची अस्सल चव

परदेशात जे पॅनकेक केले जातात त्यामध्ये मैदा, अंडी, साखर असते. म्हणजे त्यांची पारंपरिक कृती तशीच आहे. या पॅनकेक वर मग मेपल सिरप, वेगवेगळी फळे, जॅम असे घालून खाल्ले जाते. अमेरिकेत पॅनकेक हे अगदी घरगुती खाणं समजतात,. आपल्याकडे कसे आईच्या हातची पुरणपोळी किंवा मोदक आवडीने खातात, त्याच्या आठवणी काढतात. तसेच हे पॅनकेक.
आता आपण आपल्या देसी पद्ध्तीने पौष्टिक पॅनकेक करुन पाहू..

(Image : Google)

अस्सल देशी पौष्टिक पॅनकेक कसे करायचे?

 बेसिक साहित्य म्हणजे कणिक, गुळाची पावडर/काकवी, हवं तर पिठीसाखर घ्या.
आवडीप्रमाणे
कणिक 1 वाटी
गुळाची पूड /काकवी
तुम्हाला हवं तर साखरसुद्धा घालू शकता, पिठीसाखर अधिक चांगली
गोड ताक/पाणी आवडीप्रमाणे, ताक घेतलं तर चव छान येते.
चिमुटभर बेकिंग सोडा, मऊ होण्यासाठी
वर सजवायला स्ट्रॉबेरी/आंबा/सफरचंद काहीही फोडी करून
मेपल सिरप किंवा मध
पिठात गूळ /साखर/काकवी घालून, गूळ असेल तर तो नीट विरघळेपर्यंत एकत्र करा नाहीतर ओतताना त्रास होईल,
आता यात ताक घालून बेकिंग पावडर घालून छान सरसरीत करून घ्या.
पाचेक मिनिटं ठेवून द्या,जास्त ठेवलं तर चांगलं.
नॉनस्टिक तव्यावर बटर घालून ते गरम झालं की छोटी छोटी धिरडी काढा, गॅस मंद हवा ,दोन्ही बाजूने तपकिरी होईतो शेकून घ्या. वरून मग जे हवं ते टोपिंगस घालायचे आणि मध किंवा मेपल सिरप ओतून द्यावयाचे.
छान मऊ होतात,कणिक असल्याने पौष्टिक पण. सध्या आंबा उपलब्ध असल्याने तो यावर घालून अफलातून लागते. मग दुसऱ्या कशाची गरज नाही
जर वेळ असेल तर आणखीन एक सजावट करू शकता.
जी फळं आहेत ती बारीक कापून किंचित वाफवून घ्या,मऊ झाली की त्यात घरात असलेला जॅम घालून गार करा,मस्त तुकतुकीत दिसतात,याचं टॉपिंग पँनकेंक वर करा. अश्या टॉपिंग ना फ्रुट प्रिसर्व म्हणतात.
तर असा हा पौष्टिक आणि स्टायलिश असा सोपा नाश्ता.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Summer Special : How to make a pancake, make perfect desi- eggless nutritious pancakes at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.