उन्हाळा सुरु झाला की, त्या ऋतूनुसार पदार्थांची चव चाखायला मिळते. या काळात आपल्याला सतत पाण्याची तहान लागते त्यामुळे जेवण सहसा जात नाही. (Summer Recipes with Raw Mango)ताटाच्या डाव्या बाजूला हमखास वाढला जाणारा पदार्थ अर्थात चटणी, कोशिंबीर, ठेचा...(Bor (Ber) and Raw Mango Recipes) उन्हाळा म्हटलं की, आपण पदार्थांची साठवण करु लागतो. चटणी हा भारतातील तिखट खाद्यपदार्थ. प्रत्येक राज्यानुसार त्याचे विविध प्रकारे चव चाखता येते. (Healthy Raw Mango Recipes for Summer)
शाळेच्या बाहेर चिंच, बोर आणि कैरीवाल्याकडून ही पदार्थ नेहमी खाल्लीच असतील. (Summer Special Bor Recipes)आंबट-गोड लागणारी ही फळे आपल्या जीभेचे चोचले देखील तितकेच पुरवतात. याच कैरी-बोरापासून आज आपण खास रेसिपी बनवणार आहोत. उन्हाळ्यात स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि कोरड्या पडलेल्या घशाला चव येण्यासाठी ही चटणी ट्राय करु शकतो. चवीला अगदी उत्तम आणि करायला अगदी सोपी रेसिपी आहे.
Summer Special : उन्हाळ्यात महाराष्ट्रीयन कोशिंबीरीची चव काही खास, पाहा कोशिंबीरीचे ८ आंबटगोड प्रकार
साहित्य
छोटी बोर - २५० ग्रॅम
कैरी - १
गूळ - ३०० ग्रॅम
साखर - आवश्यकतेनुसार
बडीशेप - १ चमचा
चिंच - २
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी बोर आणि कैरीला स्वच्छ धुवून घ्या. कैरीचे साल काढून त्याचे लांब काप करा.
2. यानंतर कुकरमध्ये पाणी घालून बोर आणि कैरीला दोन शिट्ट्या मारुन शिजवून घ्या.
3. त्यानंतर कढईमध्ये शिजवलेले बोर-कैरीचे मिश्रण घाला त्यात गूळ, साखर,बेडीशेप आणि चिंच घाला.
4.वरुन थोडे पाणी घालून पुन्हा शिजवून घ्या. मीठ आणि लाल तिखट घाला,घट्ट झाल्यानंतर ताटात वाढा.