Join us

फूड कलर नको की कंडेन्स्ड मिल्क नको, करा रसाळ गोमट्या फणसाचे आईस्क्रीम, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2025 12:46 IST

Jackfruit ice cream recipe: Summer special ice cream: Natural jackfruit ice cream: Healthy homemade jackfruit ice cream: No condensed milk ice cream recipe: Jackfruit frozen dessert: Homemade ice cream without food coloring: Vegan jackfruit ice cream recipe: आज आपण फणसाच्या गरापासून आईस्क्रीम कसं तयार करायचं पाहूया.

उन्हाळा सुरु झाली की, आपल्याला सर्वत्र मोसमी फळे पाहायला मिळतात.(Jackfruit ice cream recipe) आंबा, कलिंगड, टरबूजसह फणसही पाहायला मिळतो.(Summer special ice cream) त्याचा सुंगध दरवळू लागला की, खाण्याचा मोह आवरता येत नाही. या रसाळ, गोड आणि मन तृप्त करण्याऱ्या फळाला बाजारात अधिक प्रमाणात मागणी असते. उन्हाळ्यात याची चव आवर्जून चाखली जाते. (Healthy homemade jackfruit ice cream)

फणसाला खनिजांचे उत्तम स्त्रोत म्हणूनही ओळखले जाते. वरुन काटेरी आणि आतून रसाळ असणाऱ्या गरामध्ये जीवनसत्त्व आणि प्रथिने आढळतात.(No condensed milk ice cream recipe) शरीराला आणि घशाला गारवा देण्यासाठी आपण उन्हाळ्यात आईस्क्रिमची चव चाखतो.(Jackfruit frozen dessert) आईस्क्रीम म्हटलं अनेकांच्या जीभेला पाणी सुटत. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे पदार्थ अनेक प्रमाणात खाल्ले जातात. आतापर्यंत आपण मॅगो, वॉटरमेलन किंवा मस्कमेलनच्या आईस्क्रिमची चव चाखलीच असेल.(Homemade ice cream without food coloring) पण आज आपण फणसाच्या गरापासून आईस्क्रीम कसं तयार करायचं पाहूया, मुलांसह घरातील इतर लोकही आवडीने खातील.  

गारेगार मस्त सोलकढीला गुलाबी रंग येण्यासाठी ३ टिप्स, 'अशी ' करा सोलकढी, उन्हाळ्यात घरबसल्या गोव्याचा आनंद साहित्य फणासचे गर - ६ दूध पावडर - अर्धी वाटी साखर- अर्धी वाटी फ्रेश क्रीम/ मलई- २ ते ३ चमचेड्रायफ्रुट्स - आवश्यकतेनुसार फणासच्या गराचे काप - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी फणसाचे गर घेऊन त्याच्या बिया काढून टाका आणि गराचे तुकडे करा.

2. आता मिक्सरच्या भांड्यात फणसाचे गर, दूध पावडर, साखर, फ्रेश क्रीम घालून चांगले वाटून घ्या. 

3. काचेच्या हवा बंद डब्यात मिक्सरमधील सर्व मिश्रण घेऊन नीट परसरवा. हे मिश्रण फ्रीजमध्ये ७ ते ८ तास सेट होण्यास ठेवा. 

4. सेट झालेले आईस्क्रीम बाहेर काढा. एका वाटीमध्ये स्कूपने तयार आईस्क्रीम घ्या, त्यावर डायफ्रूट्स आणि फणासाच्या गराचे बारीक काप पसरवा. 

5. उन्हाळ्यात खा, गारेगार फणासाच्या गराचे चवचवीत आईस्क्रीम... 

टॅग्स :अन्नपाककृती