Lokmat Sakhi >Food > चैत्राच्या स्वागताला करायलाच हवी पारंपरिक आंबे डाळ, ताज्या कैरीची आंबट-गोड रेसिपी-कैरी घालून डाळ

चैत्राच्या स्वागताला करायलाच हवी पारंपरिक आंबे डाळ, ताज्या कैरीची आंबट-गोड रेसिपी-कैरी घालून डाळ

Summer Special Kairi Raw mango Dal Recipe : उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 04:08 PM2023-03-15T16:08:58+5:302023-03-15T18:11:54+5:30

Summer Special Kairi Raw mango Dal Recipe : उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.

Summer Special Kairi Raw mango Dal Recipe : Take sour-sweet Raw Mango dal as a mouthful in summer; A quick nutritious, delicious recipe... | चैत्राच्या स्वागताला करायलाच हवी पारंपरिक आंबे डाळ, ताज्या कैरीची आंबट-गोड रेसिपी-कैरी घालून डाळ

चैत्राच्या स्वागताला करायलाच हवी पारंपरिक आंबे डाळ, ताज्या कैरीची आंबट-गोड रेसिपी-कैरी घालून डाळ

उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या तोंडाला अजिबात चव नसते. सतत पाणी पाणी होत असल्याने आपल्याला जेवणही नको वाटते. अशावेळी कैरीचे नुसते नाव काढले तरी अनेकदा आपल्या तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे पाडव्यानंतर बाजारात हिरव्यागार कैऱ्या दिसायला लागतात. या कैरीचे आंबट गोड पदार्थ म्हणजे जणू पर्वणीच. कैरीचे ताजे लोणचे, साखरांबा, गुळांबा, कैरीचे पन्हे अगदी काहीच नाही तर जेवताना तोंडी लावायला तिखट मीठ लावून कैरीच्या फोडी घेतल्या तरी जेवणाला एक वेगळी चव येते. यातच उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून एक पदार्थ केला जातो तो म्हणजे कैरीची डाळ. हरबऱ्याची डाळ आणि कैरीपासून केली जाणारी ही डाळ चविष्ट लागत असल्याने लहानांपासून मोठेही अतिशय आवडीने ही डाळ खातात. हरभऱ्याच्या डाळीत असणारे प्रोटीन आणि इतर घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कैरीमुळे त्याला येणारा स्वाद हे अतिशय उत्तम कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा (Summer Special Kairi Raw Mango Dal Recipe).

साहित्य -

१. हरभरा डाळ - २ वाट्या 

२. कैरी - एक मध्यम आकाराची

(Image : Google)
(Image : Google)

३. साखर - २ चमचे 

४. मीठ - १ चमचा

५. तेल - २ चमचे

६. जीरे - १ चमचा 

७. हिंग - पाव चमचा

८. हळद - अर्धा चमचा 

९. कोथिंबीर - अर्धी वाटी 

१०. मिरची - २ ते ३ 

कृती -

१. आदल्या दिवशी रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजवून ठेवायची. 

२. दुसऱ्या दिवशी ही डाळ अर्धवट मिक्सरमधून वाटून घ्यायची. यामध्येच वाटताना मिरची घालायची.

३. वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यात काढून त्यामध्ये कैरी किसून घालायची.

४. मीठ, साखर आवडीनुसार घालायचे.  

५. तेलामध्ये जीरे, हिंग आणि हळद घालून फोडणी करायची. ही तडतडणारी फोडी गरम असतानाच डाळीवर घालायची.

६. हे सगळे एकजीव करुन त्यावर भरपूर कोथिंबीर घाला आणि ही कैरी डाळ खायला घ्या. 

Web Title: Summer Special Kairi Raw mango Dal Recipe : Take sour-sweet Raw Mango dal as a mouthful in summer; A quick nutritious, delicious recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.