उन्हाळ्याच्या दिवसात सतत थंडगार खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते. कारण सतत घश्याला कोरड पडते. अशावेळी लिंबाचं सरबत, कोकम सरबत प्यायल्यास घशाला आणि शरीरालाही आराम मिळतो.(Kokum Sharbat Kokum Juice (Step-by-step Recipe) कोकम केवळ निरोगी राहण्यासच मदत करत नाही तर विविध आरोग्य समस्यांपासून बरे होण्यास देखील मदत करू शकते. बाहेरचं सरबत पिण्याऐवजी घरच्याघरी सरबत बनवलं तर ते अधिक चवदार आणि पौष्टीकही असेल. घरच्याघरी कोकम सरबत कसं बनवायचं ते पाहूया. (Kokum Sharbat Kokum Juice (Step-by-step Recipe)
साहित्य
कोकम - 5-6
मिंट - 1 टेस्पून
भाजलेले जिरे पावडर - 1/2 टीस्पून
पुदिना - 4 ते 5 पानं
गूळ सिरप - 2 थेंब
काळे मीठ - 1/4 टीस्पून
पाणी - 1 ग्लास
बर्फाचे तुकडे - 2-3
कृती
१) कोकम सरबत बनवण्यासाठी कोरडे कोकम मऊ होईपर्यंत रात्रभर किंवा कोमट पाण्यात काही तास भिजत ठेवा. ते मऊ झाले की मॅश करा आणि लगदा पिळून घ्या. आता तवा चांगला गरम करून त्यावर जिरे भाजून घ्या. नंतर ते चांगले बारीक करून घ्या.
उन्हाचा त्रास, जीव पाणी पाणी होतो? उन्हाळी लागते? आहार बदला, बघा नक्की काय खाणं फायद्याचं..
२) आता लगद्यामध्ये पुदिन्याची चिरलेली पाने, पाणी, भाजलेले जिरेपूड, काळे मीठ आणि पुदीना/गुळाच्या पाण्याचे २ ते ३ थेंब घाला. व्यवस्थित ढवळून हे सरबत सर्व्ह करा.