Join us  

Summer Special kokum Sharbat : उन्हाळ्यात घरीच करा गारेगार कोकम सरबत; पोटाच्या त्रासासह आजार राहतील लांब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 2:05 PM

Summer Special Kokum Sharbat Benefits : शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. (Summer Health Tips)

उन्हाळ्याच्या दिवसात ताक, दही, सरबतं पिण्याची फार इच्छा होते. कारण वाढत्या गरमीमुळे प्रत्येक ५ मिनिटाला घश्याला कोरड पडल्यासारखं वाटतं. (Drinks for Summer)अशावेळी शरीराला हायड्रेट ठेवणं फार महत्वाचं असतं. शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. (Summer Health Tips) या लेखात तुम्हाला कोकम सरबत बनवण्याची सोपी रेसेपी सांगणार आहोत.  (kokum sharbat health benefits and easy recipe) उन्हाळ्यात कोकम सरबताचं सेवन करून तुम्ही शरीराला ताजंतवानं ठेवून डिहायड्रेशन होण्यापासून बचाव करू शकता.

कोकम सरबत बनवण्याची सोपी पद्धत (How to make kokum sharbat)

१) वाळलेलं कोकम 4 कप पाण्यात 1-2 तास भिजत ठेवा.

२) चांगले स्मॅश करून पाणी गाळून घ्या.

३) कढईत उरलेले कोकम, साखर, भाजलेली जिरेपूड, वेलची पावडर, काळे मीठ आणि साधं मीठ टाका.

४) साखर वितळेपर्यंत मंद आचेवर 6-8 मिनिटे शिजवा.

५) पॅनमध्ये कोकमाचं पाणी घाला आणि मिश्रणाला उकळी येऊ द्या.

६) 3 ते 5 मिनिटे शिजवा.

७) गॅसवरून पॅन काढा आणि मिश्रण थंड होऊ द्या.

८) हे मिश्रण गाळून काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.

१०) सरबत बनवण्यासाठी ३ चमचे कोकमाचं मिश्रण घालून  एक ग्सास थंड पाण्यात मिसळा.  तयार आहे कोकम सरबत.

फायदे

१) कोकमचा रस त्वचेसाठी फायदेशीर आहे कारण त्यात दाहक-विरोधी आणि ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म आहेत जे त्वचेच्या काळजीसाठी फायदेशीर आहेत. ते नियमित प्यायल्याने तुमची त्वचा मुलायम होते.

२) कोकमचा रस शरीरातील उष्णतेची पातळी कमी करतो आणि ऑक्सिडेटिव्ह झीज कमी करतो. अशा प्रकारे, ते तुमच्या यकृताला नुकसान होण्यापासून वाचवते. जर तुम्ही नियमितपणे रस प्यायला तर कोकम तुमच्या यकृतावरील विषारी रसायनांचा प्रभाव कमी करते.

४) शरीरातील जळजळ अल्झायमर, कर्करोग, संधिवात, हृदयाच्या समस्या आणि इतर अनेक गंभीर आजारांच्या जोखमीशी संबंधित आहे. कोकममध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे शरीराला या आजारांपासून सुरक्षित ठेवतात.

५) आजच्या काळातील व्यस्त जीवनशैलीमुळे माणूस अनेकदा चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त होतो. जे शरीरासाठी हानिकारक आहे. कोकमामध्ये हायड्रॉक्सिल-सायट्रिक ऍसिड असते जे चिंता आणि तणावाची पातळी कमी करण्यास मदत करते, जे तुम्हाला आनंदी  ठेवण्यास मदत करते.  

टॅग्स :अन्नपाककृतीहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.