आपण वेगवेगळ्या चटण्या करतो. अनेक प्रकारच्या ओल्या तसेच सुक्या चटण्या भारतामध्ये घरोघरी केल्या जातात. (Summer Special: Make a mint chutney at home)मात्र ही एक चटणी उन्हाळ्याच्या दिवसांसाठी खास आहे. उन्हाळ्या दिवसांमध्ये खावेत असे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुदिना. शरीरासाठी पुदिना या उन्हाळी दिवसांमध्ये फार फायदेशीर ठरतो. म्हणून सरबतांमध्ये किंवा ताकामध्ये आपण पुदिना वापरतो. (Summer Special: Make a mint chutney at home)पुदिन्यामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. तसेच अँण्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. पुदिना थंड असतो. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करुन थंडावा देण्याचे काम पुदिना करतो.
पुदिन्याची चटणी फार चविष्ट लागते. मुळात सगळ्या पदार्थांबरोबर ही चटणी खाता येते. शिवाय फ्रिजमध्ये नीट ठेवल्यावर तीन ते चार दिवस टिकते. या चटणीमध्ये कोथिंबीरीचाही वापर केला जातो. शरीरासाठी कोथिंबीर फायदेशीर असते. तसेच यामध्ये लिंबाचा रस असतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तसेच इतरही वेळी लिंबू शरीरासाठी गरजेचा असतो. ही चटणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करणे नक्कीच उपयुक्त ठरेल शिवाय चवीलाही मस्त असते.
साहित्य
पुदिना, कोथिंबीर, लिंबू, मीठ, पाणी, आलं, जिरे, हिरवी मिरची
कृती
१. पुदिन्याची पाने छान धुऊन घ्या. देठ काढून घ्या. फक्त पानांचा वापर करा. देठ जरा कडू लागतो. चटणीची चव बदलू शकते. कोथिंबीरही छान धुऊन घ्या. पुदिना व कोथिंबीर व्यवस्थित निवडून घ्या.
२. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करा. तुम्हाला तिखट कसं आवडते त्यानुसार मिरचीचे प्रमाण ठरवा.
३. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाने घ्या. त्यामध्ये कोथिंबीरही ही घाला. एक जुडी पुदिना वापरलात तर एक लहान जुडी कोथिंबीर वापरा. पुदिन्याचा उग्रपणा कोथिंबीरीमुळे बॅलेंन्स होतो.
४. त्यामध्ये एका लिंबाचा रस पिळा. चवीपुरते मीठ घाला. हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. जिरे घाला. जिरे पूड वापरली तरी चालेल. आल्याचा तुकडा वापरा. त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घाला. चटणी वाटली जाईल एवढेच पाणी घ्या. सगळे पदार्थ अगदी एकजीव होईपर्यंत वाटून घ्या.
५. पुदिना छान वाटला गेला तरच चटणी छान लागते. नाही तर चोथा लागतो.