Join us  

सतत थंड प्यावंसं वाटतं? घरीच १० मिनिटांत करा गारेगार खरबूज ज्यूस, एक घोट घेताच वाटेल फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 12:29 PM

Summer Special Muskmelon juice recipe : ताजी फळं घरी आणून अगदी ५ ते १० मिनिटात तुम्ही गारेगार ज्यूस बनवू शकता.

गरमीच्या वातावरणात शरीरातील उष्णता वाढल्यानं  घश्याला कोरड पडते. पाण्याशिवाय काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा सतत होत असते. अशावेळी नेहमीच बाहेरचे फ्रुट ज्यूस किंवा सोडा, सरबत पिणं योग्य नाही.(Summer Special Muskmelon juice recipe) बाहेरचे पदार्थ  बनवताना कितपत स्वच्छ ठेवली जाते याची कल्पना नसल्यानं अनेकदा आजारी पडण्याचा धोका असतो.

त्यापेक्षा ताजी फळं घरी आणून अगदी ५ ते १० मिनिटात तुम्ही गारेगार ज्यूस बनवू शकता. वाटेल तेव्हा फ्रिजमधून काढून केव्हाही हा ज्यूस तुम्ही पिऊ शकता. (Muskmelon Juice Recipe How to make Muskmelon Juice)खरबूज ज्यूस घरी कसा बनवायचा ते पाहूया.

खरबूजात थंड गुणधर्म असल्यानं उष्णतेमुळे उद्भवणारे विकार दूर होण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही कधीही या ज्यूसचे सेवन करू शकता. खरबूजाचा ज्यूस बनवण्यासाठी सगळ्यात आधी खरबूज कापून त्याच्या बिया काढून घ्या. नंतर या फळातील गर बाहेर काढा. खरबुजाच्या बिया तुम्ही कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरू शकता.

न लाटता- न शिजवता १० मिनिटांत करा रव्याचे पापड; सोपी झटपट रेसिपी- खुसखुशीत रवा पापड

मिक्सरच्या भांड्यात खरबूजाचा गर, साखर आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करा. हा  पातळ रस तयार झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण रिकाम्या खरबूजात भरा. त्यात चमचाभर पाण्यात भिजवलेल्या सब्जाच्या बिया घाला. तयार आहे चवदार, थंडगार खरबूजाचा ज्यूस.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स