Lokmat Sakhi >Food > लिंबू घरात नसले तरी १ मिनिटात करा लिंबू सरबत, पाहा सोपी ट्रिक; तापलेल्या उन्हात सुखद गारवा

लिंबू घरात नसले तरी १ मिनिटात करा लिंबू सरबत, पाहा सोपी ट्रिक; तापलेल्या उन्हात सुखद गारवा

Summer Special Nimbu Sharbat Premix Recipe (Limbu pani kase banvave) : लिंबू चिरण्याची झंझट, ना साखर वितळवण्यात वेळ जाणार; १ सोपी ट्रिक; ५ मिनटांत बनेल लिंबू सरबत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 01:42 PM2024-03-11T13:42:39+5:302024-03-11T13:56:33+5:30

Summer Special Nimbu Sharbat Premix Recipe (Limbu pani kase banvave) : लिंबू चिरण्याची झंझट, ना साखर वितळवण्यात वेळ जाणार; १ सोपी ट्रिक; ५ मिनटांत बनेल लिंबू सरबत

Summer Special Nimbu Sharbat Premix Recipe : Lemon Sharbat Recipe Fresh Lime Juice Recipe | लिंबू घरात नसले तरी १ मिनिटात करा लिंबू सरबत, पाहा सोपी ट्रिक; तापलेल्या उन्हात सुखद गारवा

लिंबू घरात नसले तरी १ मिनिटात करा लिंबू सरबत, पाहा सोपी ट्रिक; तापलेल्या उन्हात सुखद गारवा

उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेरून आल्यानंतर किंवा दुपारच्यावेळी घरात असतानाही काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. (Cooking Hacks) अशावेळी घरात खास काही नसेल तर बाहेरून कोल्डड्रिंक आणण्याशिवाय  काही पर्याय उरत नाही. (How to Make Nimbu Sharbat) हे करण्यापेक्षा घरच्याघरी अगदी कमीत कमी वेळेत तुम्ही लिंबू सरबत बनवू शकतता. या युनिक पद्धतीचे इंस्टंट लिंबू सरबत बनवण्यासाठी तुम्हाला  लिंबू चिरण्याची साखर वितळवण्याची झंझट करावी लागणार नाही.  (Lemon Sharbat Premix Recipe)

इंस्टंट लिंबू सरबत कसे  करायचे? (Instant Limbu Sharbat Recipe)

1) तुम्हालाही लिंबू सरबत पटकन बनवायचं असेल त्याआधी पूर्व तयारी करावी लागेल. लिंबू सरबताचे प्रिमिक्स बनवून घ्या. त्यासाठी ४ ते ५ मध्यम आकाराचे किंवा मोठे लिंबू हाताने किंवा चॉपिंग बोर्डवर चोळून घ्या. लिंबू चोळून घेतल्यानंतर मधोमध कापून लिंबातील  बीया काढून घ्या. त्यानंतर लिंबाचा रस काढून एका ग्लासात भरून ठेवा.

2) लिंबाचा रस मोजून एका पसरट ताटात काढून घ्या. त्यात तिप्पट साखर घाला. १ कप लिंबाच्या रसासाठी ३ कप  साखर घ्या. साखर व्यवस्थित पसरवून पंख्याखाली सुकवण्यासाठी ठेवा. सुकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने खाली वर करून घ्या.  ३ दिवसांत हे मिश्रण पूर्णपणे सुकेल. 

3) त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून हे मिश्रण बारीक करून घ्या. ही पावडर  एका काचेच्या भांड्यात भरून ठेवा.  काचेच्या बरणीत भरून ही पावडर १५ दिवस ते एक महिना चांगली राहील. जेव्हा तुम्हाला हवं असेल तेव्हा  एक ग्लासभर पाण्यात १ चमचा ही पावडर मिसळा.  रिफ्रेशिंग लिंबू सरबत फक्त ५ ते १० मिनिटांत तयार होईल.

कितीपण खा वजनच वाढत नाही-हडकुळे दिसता? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भरपूर ताकद येईल

लिंबू सरबत पिण्याचे फायदे  (Nimbu (Lemon) Sharbat Health Benefits)

लिंबू व्हिटामीन सी  चा एक चांगला स्त्रोत आहे. व्हिटामीन सी इम्यूनिटी वाढवण्यास मदत करतो. इम्यूनिटी मजबूत असल्यास गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी कमी होतो. लिंबातील व्हिटामीन सी आणि फ्लेवोनोइड्स स्किनसाठी फायदेशीर ठरते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवर निखार येतो. 

व्हिटामीन सी शरीरातील कोलोजन उत्पादन वाढवण्यस मदत करते. ज्यामुळे त्वचा चांगली राहते. सन २०१६  च्या एका अभ्यासात दिसून आले की लिंबाचा रस वेगवेगळ्या माध्यमातून प्यायल्याने त्वचा दीर्घकाळ चांगली राहण्यास मदत होते. 

लाल की काळा कोणता माठ वापरावा? माठात 'ही' वस्तू घाला-फ्रिजसारखं थंडगार होईल पाणी

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली रहाते.  २०१९ च्या एका अभ्यासानुसार लिंबातील पॉलिफेनॉल्स आतडे निरोगी ठेवण्यास महत्वाचे ठरतात. ज्यामुळे डायजेशनशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने आतडे चांगले राहण्यासही मदत होते. 

Web Title: Summer Special Nimbu Sharbat Premix Recipe : Lemon Sharbat Recipe Fresh Lime Juice Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.