सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी व्हायरल होत असतात. दोन वेगवेगळ्या पदार्थांचं कॉम्बिनेशन करून तयार केलेल्या रेसिपी कधीकधी खवय्यांचा चांगलाच रोष ओढावून घेतात तर कधी कधी दोन वेगवेगळ्या पदार्थांची चांगलीच भट्टी जमून येते आणि मग त्यातून तयार झालेला पदार्थ चवदार झाल्यामुळे भलताच व्हायरल होतो... आता सध्या गाजर हलवा आईस्क्रिमचंही (gajar halva ice cream recipe) तेच झालं आहे.. यंदा उन्हाळ्यात हे आईस्क्रिम चांगलंच ट्रेंडिंग आहे..
गाजर हलवा आईस्क्रिमचा हा भन्नाट व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या food_with_mk या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये तो शेफ सगळ्यात आधी वाटीभर गाजर हलवा एका कुलींग पॅनवर घेतो. त्यात आईस्क्रिम टाकतो. आईस्क्रिम आणि हलवा घोटून घोटून एकजीव करतो. त्यानंतर हे मिश्रण सगळ्या पॅनवर पसरवलं जातं आणि त्यानंतर गाजर हलवा आईस्क्रिमचे छोटे छोटे रोल करून ते सर्व्ह केले जातात. अनेक खवय्यांना हे आईस्क्रिम अतिशय आवडलं असल्याचं कमेंटमध्ये दिसून येतं. काही जणांना आवडलेलं नाही, त्यामुळे त्यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पण जर खरोखरंच गाजराच्या हलव्याचे आणि आईस्क्रिमचे शौकिन असाल तर दोन्ही पदार्थांचं हे कडक कॉम्बिनेशन तुम्हाला आवडू शकतं.
गाजर हलवा आईस्क्रिम करण्यासाठी...
पद्धत हीच नसली तरी अशा प्रकारचं गाजर हलवा आईस्क्रिम आपण घरीही करू शकतो...
- फ्लेवर्ड आईस्क्रिम घरी तयार करण्यासाठी जी रेसिपी वापरतो, तशीच रेसिपी वापरून गाजर हलवा आईस्क्रिम तयार करता येईल. यासाठी आईस्क्रिम सेट करायला ठेवण्यापुर्वी त्यात गाजर हलवा मिक्स करा.
- गाजर हलवा आईस्क्रिम खाण्याची दुसरी एक अतिशय सोपी पद्धत म्हणजे गाजराचा हलवा तयार करून घ्या. व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रिम सरळ विकत आणा. आता ज्या पद्धतीने आपण आईस्क्रिम विथ गुलाबजाम खातो, त्याच पद्धतीने एका बाऊलमध्ये थोडा हलवा आणि थोडं आईस्क्रिम असं एकत्र करा आणि थंडगार गाजर हलवा आईस्क्रिम खाण्याचा आनंद घ्या..