Join us  

गाजर हलवा आईस्क्रिम! हिवाळ्यातल्या गाजर हलव्याची आठवण येत असेल तर उन्हाळ्यात खा हे व्हायरल आईस्क्रीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 2:07 PM

Summer Special Ice cream: विड्याच्या पानाचं आईस्क्रिम, पेरुचं तिखट आईस्क्रिम असे आईस्क्रिमचे विविध फ्लेवर्स आवडत असतील तर सध्या ट्रेण्डिंग (viral recipe of carrot halva ice cream) असणारं हे गाजर हलवा आईस्क्रिमही तुम्हाला नक्कीच आवडू शकतं... म्हणूनच तर बघा ही जबरदस्त व्हायरल रेसिपी..

ठळक मुद्देखरोखरंच गाजराच्या हलव्याचे आणि आईस्क्रिमचे शौकिन असाल तर दोन्ही पदार्थांचं हे कडक कॉम्बिनेशन तुम्हाला आवडू शकतं. 

सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी व्हायरल होत असतात. दोन वेगवेगळ्या पदार्थांचं कॉम्बिनेशन करून तयार केलेल्या रेसिपी कधीकधी खवय्यांचा चांगलाच रोष ओढावून घेतात तर कधी कधी दोन वेगवेगळ्या पदार्थांची चांगलीच भट्टी जमून येते आणि मग त्यातून तयार झालेला पदार्थ चवदार झाल्यामुळे भलताच व्हायरल होतो... आता सध्या गाजर हलवा आईस्क्रिमचंही (gajar halva ice cream recipe) तेच झालं आहे.. यंदा उन्हाळ्यात हे आईस्क्रिम चांगलंच ट्रेंडिंग आहे..

 

गाजर हलवा आईस्क्रिमचा हा भन्नाट व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या food_with_mk या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये तो शेफ सगळ्यात आधी वाटीभर गाजर हलवा एका कुलींग पॅनवर घेतो. त्यात आईस्क्रिम टाकतो. आईस्क्रिम आणि हलवा घोटून घोटून एकजीव करतो. त्यानंतर हे मिश्रण सगळ्या पॅनवर पसरवलं जातं आणि त्यानंतर गाजर हलवा आईस्क्रिमचे छोटे छोटे रोल करून ते सर्व्ह केले जातात. अनेक खवय्यांना हे आईस्क्रिम अतिशय आवडलं असल्याचं कमेंटमध्ये दिसून येतं. काही जणांना आवडलेलं नाही, त्यामुळे त्यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पण जर खरोखरंच गाजराच्या हलव्याचे आणि आईस्क्रिमचे शौकिन असाल तर दोन्ही पदार्थांचं हे कडक कॉम्बिनेशन तुम्हाला आवडू शकतं. 

 

गाजर हलवा आईस्क्रिम करण्यासाठी...पद्धत हीच नसली तरी अशा प्रकारचं गाजर हलवा आईस्क्रिम आपण घरीही करू शकतो...- फ्लेवर्ड आईस्क्रिम घरी तयार करण्यासाठी जी रेसिपी वापरतो, तशीच रेसिपी वापरून गाजर हलवा आईस्क्रिम तयार करता येईल. यासाठी आईस्क्रिम सेट करायला ठेवण्यापुर्वी त्यात गाजर हलवा मिक्स करा.- गाजर हलवा आईस्क्रिम खाण्याची दुसरी एक अतिशय सोपी पद्धत म्हणजे गाजराचा हलवा तयार करून घ्या. व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रिम सरळ विकत आणा. आता ज्या पद्धतीने आपण आईस्क्रिम विथ गुलाबजाम खातो, त्याच पद्धतीने एका बाऊलमध्ये थोडा हलवा आणि थोडं आईस्क्रिम असं एकत्र करा आणि थंडगार गाजर हलवा आईस्क्रिम खाण्याचा आनंद घ्या.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरलइन्स्टाग्रामसमर स्पेशल