उन्हाळ्याचे दिवस म्हटले की काही खास रेसिपी या काळात अगदी हमखास केल्या जातात. त्यातल्या बऱ्याच रेसिपींमध्ये कैरी असतेच. कैरीचं इंस्टंट लोणचं, तक्कू, मेथांबा, पन्हं हे या काळात जसं केलं जातं तसंच कैरीचं वरणही कधी तरी करून पाहा. एरवी टोमॅटो, लसूण, कांदा, आमसूल, चिंच असे पदार्थ घालून आपण रोजची आमटी किंवा वरण करतच असतो. आता उन्हाळ्यात मात्र कैरीचं वरण किंवा आमटी करून खायलाच हवी (how to make raw mango dal or amti?). कारण ताजी कैरी घालून केलेलं वरण किंवा आमटी या ऋतूनंतर पुन्हा वर्षभर चाखायला मिळत नाही (kairichi amti recipe). म्हणूनच कैरीच्या आमटीची किंवा वरणाची ही सोपी आणि चटपटीत रेसिपी एकदा करून बघाच...(kairicha varan recipe in Marathi)
कैरीचं वरण किंवा आमटी करण्याची रेसिपी
रेसिपी १
कैरीचं वरण किंवा आमटी करण्याची पहिली रेसिपी म्हणजे जेव्हा तुम्ही वरण करण्यासाठी तुरीची डाळ कुकरमध्ये शिजायला लावाल तेव्हाच त्या डाळीमध्ये कैरीच्या फोडी टाका. डाळीसोबतच कैरीच्या फोडीही शिजतील आणि कैरीचा आंबटपणा डाळीमध्ये व्यवस्थित मुरेल.
सावळा वर्ण असल्यास 'या' रंगाचे कपडे घाला- चेहऱ्यावर ग्लो येऊन दिसाल अतिशय आकर्षक
यानंतर डाळ शिजून झाली की ती व्यवस्थित मॅश करून घ्या. यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवून त्यामध्ये फोडणी करून घ्या. यानंतर शिजलेल्या डाळीमध्ये आणखी पाणी घालून ती उकळायला ठेवा. या आमटीमध्ये लाल तिखट, गूळ, चवीनुसार मीठ, गरम मसाला घाला. आमटी चांगली उकळून झाली की त्यावर कोथिंबीर घाला. गरमागरम आमटी भात किंवा पोळीसोबत छान लागेल.
रेसिपी २
या दुसऱ्या रेसिपीनुसार तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. कैरी स्वच्छ धुवून बारीक किसून घ्या. यानंतर कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या.
सर्वसामान्यांच्या घरात होणारा 'हा' पदार्थ करिना कपूरला खूपच आवडतो- म्हणाली आठवड्यातून ४ वेळा....
फोडणी झाल्यानंतर कैरीचा किस परतून घ्या. तो छान लालसर परतल्यानंतर त्यात गूळ, लाल तिखट, गरम मसाला घाला. गूळ विरघळल्यानंतर त्यात शिजलेली तुरीची डाळ आणि पाणी घाला. आमटीला चांगली उकळी आली की त्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला. यापैकी कोणत्याही रेसिपीने केलेली आमटी चवीला छानच लागते.