Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात खायलाच हवं पारंपरिक सातूचं पीठ! पोटाला गारवा देणारा खास मराठी पदार्थ-सोपी रेसिपी

उन्हाळ्यात खायलाच हवं पारंपरिक सातूचं पीठ! पोटाला गारवा देणारा खास मराठी पदार्थ-सोपी रेसिपी

Traditional Recipe Of Sattu Ka Atta: उन्हाळ्यात पोटाला आणि शरीराला थंडावा देण्यासाठी सातूचं पीठ खायलाच हवं (summer special recipe of satuche pith).. बघा अतिशय सोप्या पद्धतीने ते कसं करायचं..(how to make sattu ka atta?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 17:55 IST2025-04-23T16:31:14+5:302025-04-23T17:55:00+5:30

Traditional Recipe Of Sattu Ka Atta: उन्हाळ्यात पोटाला आणि शरीराला थंडावा देण्यासाठी सातूचं पीठ खायलाच हवं (summer special recipe of satuche pith).. बघा अतिशय सोप्या पद्धतीने ते कसं करायचं..(how to make sattu ka atta?)

summer special recipe of satuche pith, how to make sattu ka atta? sattu ka atta recipe, traditional recipe of sattu ka atta | उन्हाळ्यात खायलाच हवं पारंपरिक सातूचं पीठ! पोटाला गारवा देणारा खास मराठी पदार्थ-सोपी रेसिपी

उन्हाळ्यात खायलाच हवं पारंपरिक सातूचं पीठ! पोटाला गारवा देणारा खास मराठी पदार्थ-सोपी रेसिपी

Highlightsलहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांसाठीच सातूचे पीठ पौष्टिक ठरते.

उन्हाळ्याच्या दिवसांत खूप पाणी पाणी होतं. त्यामुळे खायला जास्त काही जात नाही. अशावेळी नेहमीच काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होत असते. म्हणूनच या दिवसांत शरीर थंड ठेवणारे पातळ पदार्थ अधिक प्रमाणात घ्यायला हवे, जेणेकरून डिहायड्रेशनचा त्रास होत नाही, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. याच पद्धतीचा एक पदार्थ म्हणजे सातूचे पीठ. सातूचे पीठ हा एक पारंपरिक पदार्थ असून भारताच्या बहुसंख्य भागांमध्ये आवडीने खाल्ला जातो. यात शरीर थंड ठेवणारे अनेक घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत सातूचे पीठ आवर्जून केले आणि खाल्ले जाते (summer special recipe of satuche pith). यामध्ये प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असते (how to make sattu ka atta?). त्यामुळे विकतचे प्रोटीन शेक घेण्यापेक्षा सातूचे पीठ खाणे कधीही योग्य (sattu ka atta recipe). लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सगळ्यांसाठीच सातूचे पीठ पौष्टिक ठरते.(traditional recipe of sattu ka atta)

सातूचे पीठ करण्याची रेसिपी 

 

साहित्य

२ वाट्या गहू

१ वाटी हरबऱ्याची डाळ

१ टेबलस्पून जिरे

पांढरे केसही होतील काळे!! पाण्यात ३ पदार्थ घालून केसांना लावा- पांढऱ्या केसांचे टेन्शन विसरा

२ टीस्पून सुंठ

१ टीस्पून वेलची पावडर किंवा ८ ते १० वेलची.

कृती

गहू आणि हरबरा डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. आणि त्यानंतर ती पुसावी आणि एका कापडावर पसरवून पंख्याखाली ठेवून एखादा तास सुकवून घ्यावी.

 

यानंतर गहू आणि डाळ दोन्ही कढईत टाकून एकत्र करावे आणि मंद आचेवर भाजून घ्यावे.

गहू, डाळ भाजून छान खमंग- लालसर झाल्यावर गॅस बंद करा आणि ते कढईतून काढून घ्या.

उन्हामुळे सनबर्न होऊन त्वचा लालसर- काळी झाली? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ लावा- थंड वाटेल

आता त्याच गरम कढईमध्ये जीरे, सुंठ आणि वेलची घालून थोडे भाजून घ्या. भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची अगदी बारीक पावडर करा. सातूचे पीठ झाले तयार. हे पदार्थ तुम्ही गिरणीतून दळून आणले तरी चालेल.

उन्हाळ्यासाठी परफेक्ट नाश्ता- थंडगार काकडी सॅण्डविच, २ मिनिटांत होणारी चटपटीत टेस्टी रेसिपी 

हे पीठ अगदी महिनाभर छान टिकते. फ्रिजमध्ये ठेवल्यास आणखी जास्त दिवस टिकू शकते. जेव्हा सातूचे पीठ खायचे असेल तेव्हा तुम्हाला पाहिजे तेवढे पीठ एका भांड्यात घाला. त्यात साखर किंवा गूळ घाला आणि थंड दूध घालून ते कालवून खा.


 

Web Title: summer special recipe of satuche pith, how to make sattu ka atta? sattu ka atta recipe, traditional recipe of sattu ka atta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.