ऊन्हाळा सुरू झाला की कुरड्या, पापड, सांडगे बनवायला सुरूवात होते. (Summer Special Recipes) अनेक घरांमध्ये बनवला जाणारा कॉमन पदार्थ म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या या मधल्यावेळेत खाण्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठीही उत्तम पर्याय आहेत. (Sabudana Batata Chakali Recipe) साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या करण्याची सोपी रेसिपी पाहूया. चकल्या जास्त कडक होतात किंवा तेलात फुलत नाहीत. अशी अनेकांची तक्रार असते. (How to Make Sabudana Batata Chakali)
उपवासाची साबुदाणा-बटाटा चकली कशी करायची? (Sago-Potato Chakali Recipe)
1) अर्धा किलो साबुदाणे पांढरं पाणी निघेपर्यंत स्वच्छ धुवून घ्या. २ ते ३ वेळा धुतल्यानंतर साबुदाणे स्वच्छ होतील. यात इंचभर वर राहील इतकं पाणी घालून रात्रभर भिजवत ठेवा. साबुदाणा खिचडीला वापरतो त्यापेक्षा जास्त मऊ भिजायला हवा.
2) साबुदाणे भिजवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात एकाचवेळी जास्त साबुदाणे न घालता थोडे थोडे साबुदाणे घालून ते बारीक करून घ्या.
डोशाचं पीठ फुगतच नाही? डाळ-तांदूळ वाटताना करा १ युक्ती, विकतासारखे सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे
3) अर्धा किलो साबुदाण्यासाठी दुप्पट म्हणजे १ किलो बटाटे उकडून सालं काढून तयार ठेवा. हे बटाटे उकडून सालं काढून घेतल्यानंतर मॅश करून किंवा किसून साबुदाण्यांमध्ये घाला.
4) साबुदाणा बटाट्याचे मिश्रण एका परातीत काढल्यानंतर त्यात २ चमचे लाल तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा जीरं घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. साबुदाणा आणि बटाट्याचे मिश्रण हाताने व्यवस्थित मळून घ्या. ७ ते ८ मिनिटं मळून घेतल्यानंतर त्यात तेल घालून पुन्हा मळून घ्या.
दही की ताक-वजन कमी करण्यासाठी फायदेशीर काय? डॉक्टर सांगतात दोघांतील फरक व फायदे
5) सोऱ्याला तेल लावून घ्या. दाबून चकलीचे पीठ भरा म्हणजे चकली तुटणार नाही. थोडं थोडं पीठ घेऊन ते सोऱ्यात भरा आणि व्यवस्थित चकल्या पाडून घ्या. चकली टाकत असताना सोरा खूप जास्त उंच नसेल याची खात्री करा.
6) चकल्या पाडून घेतल्यानंतर कडक उन्हात ३ ते ४ तासांसाठी सुकवायला ठेवा. सतत २ ते ३ दिवस तुम्ही या चकल्या वाळवण्यासाठी ठेवू शकता. चकल्या पूर्णपणे सुकल्यानंतर तळण्यासाठी तयार असतील.