उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण दही, ताक अशा पदार्थांचा आहारात समावेश करतो. चमचाभर दही, पाणी, मीठ मिसळून मिनिटभरात ताक तयार केले जाते, असे झटपट होणारे साधेसोपे (Instant Masala Chaas Cubes) प्लेन ताक तर नेहमी पितोच. परंतु कधी कधी आपल्याला बाहेर विकत मिळते तसे मसाला ताक (Masala Chaas Cubes Recipe) पिण्याची इच्छा होतेच. खरंतर, या नेहमीच्या प्लेन ताकामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, जिरे, मिरची असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घालून त्याची चव आणखीनच वाढवतो. परंतु मसाला ताक पिण्याची जी मज्जा आहे ती बाकी कोणत्याही कोल्डड्रींक्स किंवा शीतपेयात नाही(Summer Special Refreshing Masala Chaas Cubes).
विकतसारखे मसाला ताक तयार करायचे म्हटलं तर मिरची, कोथिंबीर, पुदिना, इतर मसाले असे सगळे जिन्नस एकत्रित वाटून आधी त्याचा मसाला तयार करावा लागतो. परंतु प्रत्येकवेळी आपल्याकडे मसाला ताक तयार करण्यासाठी मसाला वाटून तयार करण्याइतपत पुरेसा वेळ असेलच असे नाही. तसेच घाई गडबडीच्या वेळी हे इन्स्टंट मसाला ताक करून पिता यावे यासाठी, आपण या मसाल्याचे बर्फाच्या खड्याप्रमाणेच क्यूब्स तयार करुन स्टोअर करू शकतो. मसाला ताक तयार करण्यासाठी मसाला क्यूब्स घरच्याघरीच कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पुदिना - १ कप
२. कोथिंबीर - १ कप
३. कडीपत्त्याची पाने - १/२ कप
४. हिरव्या मिरच्या - २ (बारीक तुकडे केलेल्या मिरच्या)
५. सैंधव मीठ - चवीनुसार
६. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
७. चाट मसाला - १/२ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
९. बर्फाचे खडे - ४ ते ५ खडे
१०. पाणी - गरजेनुसार
११. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून
हिरव्यागार कैरीचा आंबट - गोड चटपटीत ठेचा! भाकरी - वरणभातासोबत मनसोक्त खा...
शहाळ्यात पाणी जास्त आहे की मलई ? कसे ओळखाल - ६ टिप्स - अचूक निवड करणे झाले सोपे...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर, कडीपत्त्याची पाने, बारीक तुकडे केलेल्या हिरव्या मिरच्या असे जिन्नस एकत्रित घालावे.
२. त्यानंतर त्यात चवीनुसार सैंधव मीठ, जिरेपूड, चाट मसाला, मीठ, बर्फाचे खडे, लिंबाचा रस, थोडे पाणी आणि बर्फाचे खडे घालावेत.
३. आता मिक्सरच्या भांड्यात हे सगळे जिन्नस एकत्रितपणे वाटून घ्यावे.
गारेगार लालचुटुक कलिंगडाचा गोळा घरीच करण्याची पाहा रेसिपी, इतकी भारी मजा येईल...
४. एकत्रित वाटून घेतलेल्या या सगळ्या पदार्थांची पातळ पेस्ट तयार झाल्यावर ही तयार पेस्ट बर्फाच्या ट्रे मध्ये ओतून घ्यावी.
५. त्यानंतर हा ट्रे फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावा. ४ ते ५ तासांसाठी ट्रे फ्रिजरमध्ये ठेवून द्यावा.
६. काही तासांनंतर आपण पाहू शकता की, बर्फाच्या खड्याप्रमाणेच मसाला ताक इन्स्टंट तयार करण्यासाठीचे क्यूब्स तयार झालेले असतील.
आपण हे तयार क्युब्स ग्लासभर ताकात एक ते दोन घालून चमच्याने विरघळवून घ्यावे. मसाला ताक पिण्यासाठी झटपट तयार आहे. मसाला ताक तयार करण्यासाठी दररोज त्याचा मसाला तयार करण्यास वेळ नसेल तर आपण अशा प्रकारे क्यूब्स तयार करुन फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. यामुळे घाईच्या वेळी देखील अगदी पटकन मसाला ताक तयार करून पिता येऊ शकते.