गरमीच्या वातावरणात पापड, कुरडया, सांडगे,लोणची, पळी पापड, उपवासाच्या चकल्या असं वर्षभराचं सामान बनवलं जातं. पापड चवीला खारट आणि चवदार लागतात. (Recipe of farali aloo sabudana papad) पापड कधी बिघडतात तर कधी वातड राहतात अशावेळी चांगली चव येण्यासाठी पापड बनवण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर पापड अजिबात फाटत नाहीत. (How to make Sabudana batata papad) बटाट्याचे पापड बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च साहित्यावर करावा लागत नाही अगदी कमीत कमी सामानात वर्षानुवर्ष टिकतील असे पापड तयार होतात. बटाटा साबुदाण्याचे पापड बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (Sabudana batata papad)
साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवायचे?
१) हे पापड करण्यासाठी सगळ्यात आधी एक बटाटा साल काढून स्वच्छ धुवून घ्या आणि कापून पाण्यात भिजवून ठेवा.
२) एक वाटी साबुदाणे मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या.
३) बटाट्याच्या फोडींमध्ये १ चमचा पाणी मिसळून बारीक पेस्ट तयार करा.
४) पाणी गरम करून त्यात साबुदाण्याची पावडर घाला. पाणी थोडं उकळल्यानंतर त्यात बटाट्याची पेस्ट घाला.
५) मंद आचेवर हे मिश्रण ढवळत असताना त्यात अर्धा कप पाणी, चिली फ्लेक्स, मीठ, जीरं, कोथिंबीर, एक चमचा मैदा घाला.
६) हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर एका प्लास्टीकच्या कागदाला तेल लावून त्यावर पसरवून ठेवा. १ ते २ दिवस कडक उन्हात सुकवल्यानंतर हे पापड तुम्ही तळू शकता.