Join us  

१ वाटी साबुदाण्यांचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; साबुदाणा-बटाटा पळी पापडांची रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 1:01 PM

Summer Special Sabudana Batata Recipe : साबुदाणा बटाट्याचे पापड सुकवायला घालताना प्लास्टीक तपासून घ्या. कारण जर प्रिटेंट किंवा  कलरफुल प्लास्टीक असेल तर याचा रंग पापडांना लागू  शकतो.

ऊन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की सर्वाच्याच घरी उपवासाचे पदार्थ बटाटा वेफर्स, चकल्या बनवण्याला सुरूवात होते. (Summer Special) बटाट्याचे पापड, साबुदाण्याच्या चकल्या खायला जितक्या रुचकर लागतात तितकंच ते करायलाही मेहनत लागते.  (Cooking Hacks) साबुदाणा, बटाट्याचे पळी पापड कुरकुरीत लागतात. (How to Make Sabudana Batata Papad)

तुम्ही उपवासाच्या दिवशी पटकन तळून हे पापड खाऊ शकता किंवा ज्या दिवशी उपवास नसेल तेव्हाही या पापडांचा आस्वाद घेऊ शकता. (Summer Special Sabudana Batata Recipe) दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे. साबुदाणा बटाट्याचे पाकड करण्यसाठी सगळ्यात आधी बटाट्याची सालं काढून स्वच्छ धुवून घ्या नंतर कापून पाण्यात भिजवून ठेवा. (Sabudana Batata Papad Recipe)

साबुदाणा-बटाट्याचे पळी पापड करण्याची सोपी रेसिपी

१) हे पापड करण्यासाठी सगळ्यात आधी एक बटाटा साल काढून स्वच्छ धुवून घ्या आणि कापून पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर वाटीभर साबुदाणे मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. त्यानंतर बटाट्याच्या फोडींमध्ये १ चमचा पाणी मिसळून बारीक पेस्ट तयार करून घ्या. पाणी गरम केल्यानंतर त्यात साबुदाण्यांची पावडर घाला.

'मला शुगरचा त्रास आहे, रोज रात्री भात खाल्ला तर डायबिटीस वाढते का? डॉक्टरांचा सल्ला

२) पाणी थोडं उकळल्यानंतर त्यात बटाट्याची पेस्ट घाला. मंद आचेवर हे मिश्रण ढवळत राहा. त्यात अर्धा कप पाणी, गरजेनुसार चिली फ्लेक्स, मीठ, जीरं, कोथिंबीर आणि १ चमचा मैदा घालून पापडाचे मिश्रण तयार करा. 

अन्नाचा कण दिसताच लगेच मुंग्यांची रांग लागते? ३ ट्रिक्स-१ सेकंदात गायब होतील मुंग्या

३) हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर एका प्लास्टीकच्या कागदाला तेल लावून त्यावर वरणाच्या  चमच्याच्या मदतीने छोटे गोलाकार पापड घाला. २ ते ३ दिवस ऊन्हात सुकवल्यानंतर पळीपापड तयार झालेले असतील. त्यानंतर गरम तेलात घालून पापड तळून घ्या. 

पापड बिघडू नयेत यासाठी खास टिप्स

साबुदाणा बटाट्याचे पापड  सुकवायला घालताना प्लास्टीक तपासून घ्या. कारण जर प्रिटेंट किंवा  कलरफुल प्लास्टीक असेल तर याचा रंग पापडांना लागू  शकतो. म्हणून शक्यतो प्लेन पारदर्शक प्लास्टीकचा वापर करा. बटाटा आणि साबुदाण्याचे पापड  करण्यासाठी तुम्ही जास्त मोठे बटाटे घेऊ नका. मध्यम आकाराच्या बटाट्यांची निवड करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स