Join us

समर स्पेशल : फक्त साबुदाणा - पाणी आणि तेल मीठ घालून करा साबुदाण्याचे पापड, पांढरेशुभ्र हलके..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:22 IST

summer special sabudana papad easy to make : साबुदाण्याचे विकतचे पापड विसरूनच जाल इतके छान घरी तयार करता येतात.

उन्हाळा व्यवस्थित जाणवायला लागला आहे. आता घरोघरी वाळवणांची तयारी सुरू असेलच. (summer special sabudana papad easy to make) प्रश्न आहे तो इमारतींमध्ये राहणाऱ्यांचा. वाळवणं वाळत घालायची कुठे? गच्चीत एखादा दिवस घालता येतात, पण आठवडाभर असं केल्याने बिल्डींगमधील इतर लोकांच्या तक्रारी यायला लागतात. 

साबुदाण्याचे पापड सर्वांनाच प्रचंड आवडतात. अगदी कुरकूरी लागतात. खास म्हणजे लहान मुलांना फार आवडतात. आपण साबुदाणा पापड विकत आणतो ते लवकर मऊ पडतात. घरी हे पापड तयार करणे फारच सोपे आहे. तसेच फार दिवस उन्हात वाळवावे लागत नाहीत. थोडं ऊन अगदी पुरेस आहे. अगदी कमी खर्चांतही तयार होतात. सामानाही अगदी कमी लागतं.

साहित्य:साबुदाणा, मीठ, पाणी, तेल

कृती:१. अख्खा साबुदाणा वापरून हे पापड तयार करायचे आहेत. त्यामुळे चुरा वगळून चांगले दाणे वापरा. २. साबुदाणा व्यवस्थित धुऊन घ्यायचा. एका धुण्यात साबुदाणा स्वच्छ होत नाही.  (summer special sabudana papad easy to make)तीन ते चार वेळा पाणी बदलून तो धुवायचा. व्यवस्थित साफ केल्यानंतर तो भिजवत ठेवायचा. जेवढा साबुदाणा त्यापेक्षा कमी पाणी वापरा. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यावर साबुदाणा चिवट होतो. त्यामुळे कमी पाण्यातच भिजत घाला. (summer special sabudana papad easy to make)३. साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा. सकाळपर्यंत तो मोकळा झाला असेल.४. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला. 

४. आपल्याला इडली पात्राचा वापर करायचा आहे. ज्याप्रकारे इडली आपण वाफवतो, अगदी तसंच पापड आपल्याला वाफवायचे आहेत. साबुदाण्याने शोषलेले पाणी यासाठी पुरेसे आहे. वेगळे पाणी वापरायचे नाही.    ५. इडली पात्राला तेल लावून घ्या. त्यावर साबुदाण्याचा पातळ थर लावा. ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्या.६. वाफवल्यानंतर पापड मऊ व चिकट झाला असेल. एका ताटाला तेल लावा त्यामध्ये ते वाफवलेले पापड काढून घ्या. ७. दिवसभरात ते वाळवून घ्या. जास्त दिवस वाळवावे लागत नाहीत. पण दुपारच्या कडक उन्हातच वाळवा. पापड कडक झाला की, तेलात तळून बघा. खुपच छान फुलतो. जर नीट फुलत नसेल तर, थोडा अजून वाळवून घ्या. 

टॅग्स :समर स्पेशलपाककृतीहोम रेमेडी