उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचा उसाचा रस पिण्याची इच्छा नेहमीच होते. उसाचा रस घेतल्यानं शरीराला गारवा मिळतो इतकंच नाही तर नैसर्गिकरित्या ग्लुकोज मिळते ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. युरिन इन्फेक्शन, डिहायड्रेशन असे त्रास टळू शकतात. उसाचा रस यकृतासाठी खूप फायदेशीर मानला जातो. (How to make sugarcane juice with jaggery)
हे यकृत डिटॉक्स करण्याचे काम करते. उसाच्या रसात असलेले अँटीऑक्सिडंट यकृतातील विषारी घटक काढून टाकतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात. उसाचा रस नेहमीच बाहेरून आणण्याची आवश्यकता नाही. घरच्याघरी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही उसाचा रस बनवू शकता. (Sugarcane juice without sugarcane) गुळाचा वापर करून हा रिफ्रेशिंग ज्यूस घरीच तयार करता येऊ शकतो.
उसाचा रस घरी कसा बनवायचा?
सगळ्यात आधी एक वाटी गूळ कपभर पाण्यात वितळवून घ्या. मिक्सरमध्ये गुळाचं पाणी घालून त्यात पुदिना, आलं, सैंधव मीठ, लिंबू, जीरं पावडर, बर्फ घालून फिरवून घ्या. एका ग्लासात बर्फ घालून त्यात हा रस घाला. चमच्याच्या साहाय्यानं हा रस ढवळून घ्या. उसाच्या रसात पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि मॅगनेशियमसारखे पोषक घटक असतात.
बटाट्याचे पापड नेहमीचे यंदा टोमॅटोचे पापड करुन पाहा, करायला सोपा आणि तळून खायला मस्त
या रसामुळे शरीरातील पित्त कमी होतं आणि जळजळही कमी होते. जास्त ढेकर आणि चक्कर येत असतील या ज्यूसचे सेवन करायला हवे. जर तुमचे केस गळत असतील, लघवीला त्रास होत असेल किंवा केस पांढरे दिसत असतील तर रोज उसाचे तुकडे चघळा.