Summer Special: भर उन्हाळ्यात सतत काहीतरी थंड खावं-प्यावंसं वाटतं. ताक लस्सी पिण्याची इच्छा तर हमखास होतेच. उन्हाळ्यात लस्सी पिणं फायदेशीर असतं. लस्सीतील दही पोट,त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. साधी लस्सी चविष्ट आणि पौष्टिक असतेच पण ती आणखीन पौष्टिक ,चविष्ट आणि स्पेशल करण्यासाठी आंबा आणि पुदिन्याचा वापर करुन मॅंगो पुदिना लस्सी करावी. ही लस्सी करणं एकदम सोपं.
Image: Google
मँगो पुदिना लस्सी कशी करावी?
मॅंगो पुदिना लस्सी करण्यासाठी 2 मोठे आंबे, 4 मोठे चमचे साखर, 3 मोठे चमचे बारीक चिरलेला पुदिना, 1 छोटा चमचा वेलची पूड, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, 4 कप दूध किंवा दही घ्यावं.
Image: Google
मॅंगो लस्सी करताना आंबाची सालं काढून आंब्याच्या गराच्या लहान लहान फोडी कराव्यात. पुदिन्याची पानं निवडून, धुवून बारीक चिरुन घ्यावीत. मिक्सरच्या भांड्यात आंब्याच्या फोडी, बारीक चिरलेली पुदिना, दही/ दूध आणि इतर सर्व साहित्य घालावं. हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावं. ते ब्लेण्डरनं ब्लेण्ड करुन घेतलं तरी चालतं. सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर त्यात बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की मॅंगो लस्सी तयार होते. पुदिना, लिंबू यामुळे ही लस्सी पचनास सुलभ होते. तोंडाला चव येते. उन्हाळ्यात दुपारी स्पेशल काही करुन प्यावंसं वाटल्यास् मॅंगो लस्सी उत्तम पर्याय आहे.