सध्या ऊन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. (Summer Special Food) ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं फार महत्वाचे असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. (Summer Tips) ज्यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळते. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि अनेक फायदे मिळतात. (Top Health Benefits Of Eating Watermelon)
1) वेब एमडी च्या रिपोर्टनुसार कलिंगडात सायट्रालाईन नावाचे एमिनो एसिड असते. ज्यामुळे शरीरातील रक्त स्थानांतरीत करण्यास मदत होते. हा ज्यूस प्यायल्याने कोलेस्टेरॉल कमी होते.
पोटाची चरबी लटकतेय? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय, झरझर घटेल चरबी-स्लिम दिसाल
2) वजन कमी करण्यासाठीही कलिंगड फायदेशीर ठरते. यात कॅलरीजचे प्रमाण कमीत कमी असते. यात फायबर्स जास्त असतात ज्यामुळे पोट लवकर भरतं आणि काही खाण्याची इच्छा होत नाही. यात पाण्याचे प्रमणाही जास्त असते. ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होईल आणि शरीर हायड्रेट राहते.
3) कलिंगडाचे नियमित सेवन केल्याने गॅसचा त्रास कमी होतो कलिंगड नियमित खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. याचा ज्यूस तब्येतीसाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो. ज्यामुळे ताण-तणावही कमी होतो.
लिव्हरचा त्रास नको, शरीर निरोगी राहावं असं वाटतं? बाबा रामदेव सांगतात १ उपाय, लिव्हर होईल डिटॉक्स
4) कलिंगडाच्या सेवनाने इम्यूनिटी मजबूत राहते. यातील व्हिटामीन सी इम्यून सिस्टिम मजबूत ठेवतो. यातील फायबर्स आतड्यांनाही निरोगी ठेवतात. कलिंगडात व्हिटामीन असते ज्यामुळे इम्यून सिस्टिम चांगली राहते आणि इन्फेक्शनचा धोका टळतो. फक्त कलिंगडच नाही तर कलिंगडाच्या बियासुद्धा फायदेशीर ठरतात.
5) कलिंगडाच्या बिया हाडांसाठी उत्तम ठरतात. यात ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात, प्रोटीन, जिंक, फॉलेट, पोटॅशियम, कॉपर मोठ्या प्रमाणात असते. याला नॅच्युरल मल्टीव्हिटामीनही समजले जाते. यात कॅलरीजचे प्रमाणही जास्त नसते.