Lokmat Sakhi >Food > Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत विकतची कुल्फी कशाला? घरच्या घरी करा गारेगार मलाई कुल्फी, घ्या रेसिपी...

Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत विकतची कुल्फी कशाला? घरच्या घरी करा गारेगार मलाई कुल्फी, घ्या रेसिपी...

Summer Special :लहान मुलांनाही आवडणारा हा पदार्थ घरी केल्याने बाधण्याची शक्यताही नसते. आता पाहूयात घरी मलाई कुल्फी कशी तयार करायची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 04:08 PM2022-04-03T16:08:11+5:302022-04-03T16:27:49+5:30

Summer Special :लहान मुलांनाही आवडणारा हा पदार्थ घरी केल्याने बाधण्याची शक्यताही नसते. आता पाहूयात घरी मलाई कुल्फी कशी तयार करायची...

Summer Special: Why purchase ice cream in summer days? Make Malai Kulfi at home, take the recipe ... | Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत विकतची कुल्फी कशाला? घरच्या घरी करा गारेगार मलाई कुल्फी, घ्या रेसिपी...

Summer Special : उन्हाळ्याच्या दिवसांत विकतची कुल्फी कशाला? घरच्या घरी करा गारेगार मलाई कुल्फी, घ्या रेसिपी...

Highlightsआपण मँगो, पिस्ता, स्ट्रॉबेरी असे आपल्या आवडीची फळे घातल्यास तसा फ्लेवर येतो. विकतची कुल्फी खाण्यापेक्षा घरात हाताने बनवलेली कुल्फी खाण्याची मजाच न्यारी

उन्हाळा म्हटला की अंगाची लाहीलाही, एप्रिल महिना म्हणजे तर उकाड्याचा कहरच. या दिवसांत थंडावा देणार आइस्क्रीम आणि कुल्फी म्हणजे शरीराबोरबरच मनाला शांत करण्याचे पर्याय (Summer Special). सतत बाहेरचे आइस्क्रीम आणि कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने मलाई कुल्फी केली तर? कमीत कमी वेळात आणि कष्टात तयार होणारी ही कुल्फी (Malai kulfi) खायला तर बाहेरच्यासारखी लागतेच पण घरात स्वच्छतेत केल्याने ती आरोग्यासाठीही जास्त चांगली असते. उन्हाळ्यात कधी सूर्य डोक्यावर असताना तर कधी रात्रीच्या वेळी उकाडा कमी करण्यासाठी आपण आवर्जून कुल्फी खातो. दुधापासून तयार केली जाणारी ही कुल्फी घरी अगदी झटपट तयार करता येते. विशेष म्हणजे विकतपेक्षा कमी खर्चात होत असल्याने आपण ती मनसोक्त खाऊ शकतो. लहान मुलांनाही आवडणारा हा पदार्थ घरी केल्याने बाधण्याची शक्यताही नसते. आता पाहूयात घरी मलाई कुल्फी कशी तयार करायची.

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. दूध - २ लिटर

२. साखर - २ वाट्या 

३. फ्रेश क्रिम - १ वाटी

४. मिल्क पावडर - १ वाटी 

५. सुकामेवा - आवडीनुसार 

६. वेलची पावडर - पाव चमचा 

कृती -

१. दूध एका कढईमध्ये किंवा पातेल्यात घेऊन १५ ते २० मिनीटे मध्यम गॅसवर ठेवून उकळावे आणि हलवत राहावे.

२. फ्रेश क्रिम, अर्धा कप दूध आणि मिल्क पावडर एकत्र करुन त्यापासून मावा तयार करुन घ्यायचा. 

३. उकळलेल्या दूधात मावा, साखर आणि सुकामेव्याचे काप घालून गाठी होणार नाहीत असे हलवत मध्यम आचेवर ठेवावे. 

४. वेलची पावडर घालून हे मिश्रण पूर्ण गार होऊ द्यावे.

५. मावा, सुकामेवा आणि इतर दूध आटवल्यामुळे हे मिश्रण काहीसे घट्टसर व्हायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

६. कुल्फीचे साचे असतील तर त्यात नाहीतर बाऊल किंवा लहान आकाराच्या ग्लासमध्येही आपण हे मिश्रण घालू शकतो. 

७. हे मिश्रण घातलेले साचे ६ ते ७ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवावेत. त्यानंतर ते बाहेर काढल्यानंतर साध्या पाण्यात बुडवून त्याची कुल्फी काढून खाण्यासाठी घ्यावी. 

८. आपल्या आवडीनुसार वरुन ड्रायफ्रूटस, जेली, केशर असे घातल्यास आणखी चांगले लागते. 

९. यामध्ये आपण मँगो, पिस्ता, स्ट्रॉबेरी असे आपल्या आवडीची फळे घातल्यास तसा फ्लेवर येतो. 


Web Title: Summer Special: Why purchase ice cream in summer days? Make Malai Kulfi at home, take the recipe ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.