When to Drink Coconut Water In Summer : उन्हाळा आला की, जास्तीत जास्त लोक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाचं पाणी पितात. नारळाचं पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नारळाच्या पाण्यात कॅलरी कमी असतात आणि नॅचरल एंझाइम्सही असतात. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून नारळाचं पाणी प्यायला हवं. पण हे पाणी या दिवसात कधी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ...
उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ
मुळात नारळ पाणी पिण्याची अशी कोणती एक वेळ नाहीये. हे पाणी कधीही पिता येऊ शकतं. पण तरीही हे उपाशीपोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं. सकाळी उपाशीपोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. सकाळी नारळ पाणी प्याल तर हार्टबर्न, अॅसिडिटी आणि मॉर्निंग सिकनेस दूर होतं.
वर्कआउट करण्याआधी
वर्कआउट करण्याआधी किंवा नंतर नारळ पाणी पिता येऊ शकतं. नारळ पाणी हे एक हायड्रेटिंग ड्रिंक आहे आणि शरीराला ऊर्जा देतं. अशात हे तुम्ही एनर्जी बूस्टिंग ड्रिंकसारखं पिऊ शकता.
दुपारच्या वेळ नारळ पाणी प्याल तर याने पचन क्रिया चांगली होते. याने डायजेशनसंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतात. जेवण केल्यावर पोट फुगण्याची समस्याही होत नाही. नारळ पाण्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होतात ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं.
जर रात्री झोपण्याआधी नारळ पाण्याचं सेवन केलं तर याच्या सुगंधाचे साइकोलॉजिकल इफेक्ट्स व्यक्तीवर प्रभाव टाकतो ज्यामुळे चिंता-तणाव कमी होतो. सोबतच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात.
नारळ पाणी नियमित पिण्याचे फायदे
1) त्वचा चांगली राहते
नारळ पाणी तरल पदार्थांचं एक चांगला सोर्स आहे आणि यानं शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत मिळते. तसेच या अॅंटी-ऑक्सिडेंट असल्याने याने तुमच्या फाइन लाईन्स आणि सुरकुत्या दूर करण्यासही मदत मिळते. अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होत नाही. यात व्हिटॅमिन सी आणि ई सुद्धा असतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.
2) किडनी स्टोनपासून बचाव
किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण सोबतच थोडं नारळ पाणीही प्यायला हवं. कारण याने लघवीची फ्रीक्वेंसी वाढते आणि स्टोन तयार करणारे खनिज कमी तयार होतात. अशात किडनी स्टोनपासून तुमचा बचाव होतो.
3) पचन चांगलं होतं
नारळ पाण्यात भरपूर फायबर असतं. जे पचन चांगलं करण्यास मदत करतं. यात असेही काही एंजाइम असतात जे तुमच्याकडून खाण्यात आलेल्या अन्नाला तोडण्यास मदत करतात. तसेच याने पोटाच्या अनेक समस्याही दूर होतात.
4) इलेक्ट्रोलाइट संतुलन
नारळ पाण्यात पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअम असतात, जे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स आहेत. यांनी शरीरातील द्रव्याला संतुलित ठेवण्यात मदत मिळते. हे त्या लोकांसाठी फायदेशीर असतात ज्यांना खूप जास्त घाम येतो.
5) ब्लड प्रेशर संतुलन
नारळ पाण्यात ब्लड प्रेशर कमी करण्यास किंवा संतुलित ठेवण्यास मदत मिळते. खासकरून हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरतं. आपल्या हाय पोटॅशिअम तत्वांमुळे याने सोडिअमचा प्रभाव संतुलित करण्यास मदत मिळते.