काहीतरी क्रिस्पी खाण्याची इच्छा झाली तर, अनेक घरात बटाट्याचा किस हा पदार्थ केला जातो. बटाट्याचा किस हा योग्य साहित्यात, अचूक पद्धतीने बनवल्यास उत्तम बनतो. मात्र, हा पदार्थ बनवताना बायकांची तारांबळ उडते. बटाट्याचा किस बनवताना काही वेळेला बिघडतो.
बटाटा हा कधी कच्चा राहतो तर, कधी योग्य प्रकारे शिजत नाही, त्याचा लगदा होतो. पण या रेसिपीला फॉलो करून बनवल्यास बटाट्याचा किस उत्तम बनेल यात शंका नाही. त्यामुळे बटाट्याचा किस करण्याची ही नवी पद्धत पाहा, कमी साहित्यात, कमी वेळात हा पदार्थ तयार होईल. यासह हा पदार्थ वर्षभर टिकेल. त्यामुळे कधीही काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा झाली तर, डबा खोला, किस काढून तळून आरामात खा(Sun dried Batatyacha Kees Recipe).
बटाट्याचा किस बनवण्यासाठी लागणारं साहित्य
अर्धा किलो बटाटे
सैंधव मीठ
घरच्याघरी विकतसारखे कुरकुरीत पापड हवेत? घ्या खास उडीद पापड मसाला रेसिपी.. पापड होतील परफेक्ट
पाणी
बटाट्याचा किस बनवण्याची कृती
सर्वप्रथम, बटाटे सोलून घ्या, त्याचा किस तयार करा. आता तयार बटाट्याच्या किस ४ ते ५ वेळा पाण्यातून धुवून घ्या. किस धुवून झाल्यानंतर चाळणीत काढून घ्या, जेणेकरून बटाट्यामधून अतिरिक्त पाणी निघून जाईल.
आता दुसरीकडे एका भांड्यात एक लिटर पाणी गरम करत ठेवा, त्यात सैंधव मीठ घालून पाण्याला उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बटाट्याचे किस घालून मिक्स करा. आता चमचाच्या मदतीने बटाट्याचा किस हलवून घ्या. ३ मिनिटासाठी त्यावर झाकण ठेऊन बटाट्याचा किस शिजवून घ्या. बटाट्याला जास्त शिजवू नका, थोडे कच्चे ठेवा. आता बटाट्याचे किस एका प्लेटमध्ये काढून घ्या. पाण्यामधून काढून घेतल्यानंतर त्वरित एका प्लास्टिक पेपरवर हे बटाट्याचे किस पसरवून ठेवा. बटाट्याचा किस २ दिवसांसाठी उन्हामध्ये चांगले वाळवून घ्या.
मटकीला भरपूर आणि लांबसडक मोड येण्यासाठी १ सोपी ट्रिक, मटकीची उसळ होईल चविष्ट
अशा प्रकारे, बटाट्याचा किस रेडी. आपल्याला हवं तेव्हा हा किस तेलात तळून खाऊ शकता. हे किस तयार झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा.