Lokmat Sakhi >Food > ना तेल-ना गॅस, १ किलो पोह्याची करा १०० काटेरी वाळवणाची चकली, तळताच फुलतील दुप्पट

ना तेल-ना गॅस, १ किलो पोह्याची करा १०० काटेरी वाळवणाची चकली, तळताच फुलतील दुप्पट

वSun dried poha chakli-Easy Recipe : वर्षभर टिकणारी आणि दुप्पट फुलणारी कुरकुरीत पोह्याची चकली | उन्हाळा स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 01:19 PM2024-03-14T13:19:30+5:302024-03-14T13:20:30+5:30

वSun dried poha chakli-Easy Recipe : वर्षभर टिकणारी आणि दुप्पट फुलणारी कुरकुरीत पोह्याची चकली | उन्हाळा स्पेशल

Sun dried poha chakli-Easy Recipe | ना तेल-ना गॅस, १ किलो पोह्याची करा १०० काटेरी वाळवणाची चकली, तळताच फुलतील दुप्पट

ना तेल-ना गॅस, १ किलो पोह्याची करा १०० काटेरी वाळवणाची चकली, तळताच फुलतील दुप्पट

उन्हाळा सुरु झाल्यानंतर महिलावर्ग वाळवणाच्या तयारीला लागतात. पापड, कुरडई, सांडगे यासह चकली देखील केली जाते. साबुदाणा-बटाट्याची चकली आपण खाल्लीच असेल (Cooking Tips). पण उन्हाळ्यात पोह्यांछी चकली देखील आवर्जून केली जाते. जर आपण पोह्यांचा वापर फक्त चकली करण्यासाठी करत असाल तर, थांबा (Chakli Recipe). एकदा पोह्यांची चकलीही करून पाहा.

सध्या सोप्या पद्धतीने झटपट या चकल्या त्यात होतात (Sun Dried Foods). शिवाय तळल्यानंतर दुप्पट फुलतात. चला तर मग, वाळवणाची पोह्याची चकली कशी तयार करायची पाहूयात(Sun dried poha chakli-Easy Recipe).

वाळवणाची पोह्याची चकली करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

पांढरे तीळ

जिरे

ठेचलेली हिरवी मिरची

२ उकडलेले बटाटे-साबुदाण्याचे पीठ, १५ मिनिटतात ५० पापडाची पाहा सोपी कृती; तळताच फुलतील दुप्पट

मीठ

बेकिंग सोडा

पाणी

कृती

सर्वप्रथम, एका परातीत एक किलो पोहे घ्या. त्यात पाणी घालून २ वेळा पोहे स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यातील पाणी निथळून भिजलेले पोहे एका चाळणीवर काढून ठेवा. ५ ते १० मिनिटानंतर भिजवलेले पोहे एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्या, व हाताने मॅश करून घ्या.

पोहे मॅश केल्यानंतर त्यात एक टेबलस्पून पांढरे तीळ, अर्धा टेबलस्पून जिरे, एक चमचा ठेचलेली हिरवी मिरची, एक टेबलस्पून मीठ, एक टेबलस्पून बेकिंग सोडा घालून साहित्य हाताने एकजीव करा, व छान मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा काही वेळासाठी बाजूला ठेवा.

विकतसारखे दही घरात तयार होते? एक जबरदस्त टीप; पाणी न सुटता - गोडसर दही होईल तयार..

नंतर चकली तयार करणाऱ्या साच्याला थोडे पाणी लावा, त्यात मळलेले पीठ भरून चकली एका प्लास्टिकच्या पेपरवर पाडून घ्या. घरात फॅनखाली किंवा उन्हात वाळत घाला. शेवटी कडकडीत उन्हात सुकवल्यानंतर चकली हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवा. जेव्हा खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तेलात तळून दुप्पट फुलणाऱ्या खमंग चकलीचा आस्वाद घ्या.

Web Title: Sun dried poha chakli-Easy Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.