Join us  

पांढरेशुभ्र बटाटा वेफर्स करण्याची सोपी झ्टपट पद्धत, वर्षभर टिकतील वेफर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 5:42 PM

Sun-Dried Potato Chips (Potato Wafers) घरच्याघरी वेफर्स करताना काय चुका टाळता येतील?

बटाट्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. बटाटा हा प्रत्येक पदार्थात फिट होतो. उन्हाळा सुरु झाल्यानंतर महिलावर्ग बटाट्याचे चिप्स बनवतात. हे चिप्स वाळवून साठवून ठेवतात. जेव्हा हवे असल्यास त्याला तळून खाण्यात मज्जा काही वेगळीच आहे. बटाट्याचे चिप्स बनवणे खूप अवघड आहे. कधी बटाटे अतिप्रमाणावर शिजतात तर कधी कच्चे राहतात. आपल्याला जर बटाटे चिप्स योग्य पद्धतीने बनवायचा असतील तर, ही रेसिपी पाहा. या ट्रिकमुळे बटाटे चिप्स नक्कीच बाजारात मिळतात तसे तयार होतील. चला तर मग या झटपट पदार्थाची कृती पाहूयात(Sun-Dried Potato Chips, Potato Wafers).

बटाटे चिप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

फिटकरी

वांग्याचं अस्सल गावरान चमचमीत भरीत करण्याची खास रेसिपी, करा भरीत-भाकरी बेत

पाणी

मीठ

बटाटे चिप्स बनवण्याची कृती

सर्वपथम, बटाट्याचे साल काढून त्याचे किसणीने काप करून घ्या. आता एका भांड्यात पाणी घ्या, त्या पाण्यात फिटकरी फिरवा. याच पाण्यात बटाट्याचे काप २ तासांसाठी भिजत ठेवा. २ तास झाल्यानंतर बटाट्याच्या कापांना पुन्हा नव्या पाण्यातून धुवून काढा. व हे बटाट्याचे काप चाळणीत काढून घ्या. जेणेकरून त्यातून अतिरिक्त पाणी निघून जाईल.

झटपट ५ मिनिटांत वरण करण्यासाठी तयार करुन ठेवा ‘दाल प्रिमिक्स’, झटपट गरमागरम वरणभात तयार

आता एक भांड्यात २ ते ३ लिटर पाणी गरम करत ठेवा. त्यात ३ चमचे सैंधव मीठ घालून बटाट्याचे काप शिजवून घ्या. बटाटे पूर्ण शिजवून घ्यायचं नाही. ८० टक्के बटाटे शिजवून घ्या. बटाटे शिजल्यानंतर चाळणीत ठेवा, म्हणजे यातून अतिरिक्त पाणी निघून जाईल.

आता हे चिप्स उन्हात वाळवण्यासाठी ठेवा. २ ते ३ दिवसात हे चिप्स सुकतील. अशा प्रकारे बटाट्याचे हटके स्टाईल चिप्स रेडी. आपल्याला जेव्हा मन करेल तेव्हा हे चिप्स तळून खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स