Lokmat Sakhi >Food > सनी लिओनीला आवडतो देसी ढाबास्टाईल आलू पराठा, झटपट पराठा करण्याची पाहा सोपी रेसिपी

सनी लिओनीला आवडतो देसी ढाबास्टाईल आलू पराठा, झटपट पराठा करण्याची पाहा सोपी रेसिपी

Sunny Leone's Favourite "Aloo Ka Paratha" Recipe : एक उकडलेला बटाटा-कपभर गव्हाचं पीठ, आलू पराठा खाण्यासाठी आता ढाब्यावर जाण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 12:06 PM2024-01-24T12:06:28+5:302024-01-24T12:07:40+5:30

Sunny Leone's Favourite "Aloo Ka Paratha" Recipe : एक उकडलेला बटाटा-कपभर गव्हाचं पीठ, आलू पराठा खाण्यासाठी आता ढाब्यावर जाण्याची गरज नाही

Sunny Leone's Favourite "Aloo Ka Paratha" Recipe | सनी लिओनीला आवडतो देसी ढाबास्टाईल आलू पराठा, झटपट पराठा करण्याची पाहा सोपी रेसिपी

सनी लिओनीला आवडतो देसी ढाबास्टाईल आलू पराठा, झटपट पराठा करण्याची पाहा सोपी रेसिपी

भारतीय पदार्थांमध्ये पराठा फार फेमस आहे. आलू, कोबी, मेथी, गाजर यासह विविध भाज्यांचे स्टफिंग भरून पराठा तयार केला जातो (Aloo Paratha). या पराठ्यांमध्ये आलू पराठा खूप फेमस आहे. नाश्ता असो, लंच किंवा डिनर प्रत्येक जण जेवणामध्ये आवडीने आलू पराठा खातो. आलू पराठा चवीला तर भन्नाट लागतोच, शिवाय एक खाल्ल्याने पोट गच्च भरते. ज्यामुळे बऱ्याचदा जास्त भूकही लागत नाही (Cooking Tips and Tricks). आलू पराठा हा पदार्थ कमी साहित्यात झटपट तयार होतो.

चवीला तर हा पदार्थ भन्नाट लागतोच, शिवाय आरोग्याला अनेक पौष्टीक घटक मिळतात. आलू पराठा प्रत्येकाला आवडतो, विशेष म्हणजे अभिनेत्री सनी लिओनी देखील आपल्या चीट डेला आलू पराठा खाते (Sunny Leone). जर आपल्याला ढाबास्टाईल आलू पराठा खायचा असेल तर, या रेसिपीला फॉलो करून पाहा. ही रेसिपी खुद्द सनी लिओनीने शेअर केली आहे(Sunny Leone's Favourite "Aloo Ka Paratha" Recipe).

आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

हिंग

आलं-लसूण पेस्ट

लाल तिखट

हळद

मीठ

कोथिंबीर

ढाबास्टाईल डाळ तडका-घरीच करा १० मिनिटात, रोजच्या वरणाला येईल हॉटेलस्टाईल चव

तेल

गव्हाचं पीठ

पाणी

बटर

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा हिंग, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद घालून मसाला भाजून घ्या. नंतर त्यात उकडलेले बटाटे घालून चमच्याने मसाल्यात मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर भुरभुरून चमच्याने मॅश करा. अशा प्रकारे आलू पराठ्याचे स्टफिंग तयार.

कोण म्हणतं घरी लोणी स्पंज डोसा करता येत नाही? पीठ दळताना घाला २ पांढऱ्या गोष्टी

दुसरीकडे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो, त्याप्रमाणे गव्हाचं पीठ घेऊन मऊ कणिक मळून घ्या. कणिक मळून झाल्यानंतर एक मोठा गोळा घ्या. कणकेचा गोळा लाटून घ्या, त्याच्यामध्यभागी चमच्याने स्टफिंग भरून कणकेची पारी बंद करा, व त्यावर थोडे पीठ शिंपडून हलक्या हाताने लाटून घ्या.

गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. तव्याला तेल किंवा बटर लावा. हलक्या हाताने पराठा तव्यावर ठेवा. पराठा एका बाजूने भाजला गेला की, चमच्याने पलटून दुसऱ्या बाजूवर बटर लावून भाजून घ्या. पराठा दोन्ही बाजूने भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे स्वादिष्ट आलू पराठा खाण्यासाठी रेडी. आपण हा पराठा चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

Web Title: Sunny Leone's Favourite "Aloo Ka Paratha" Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.