Lokmat Sakhi >Food > ना साखर- ना गॅस, कपभर सुक्या खोबऱ्याचे करा झटपट पौष्टीक लाडू; हाडांची दुखणी होतील दूर

ना साखर- ना गॅस, कपभर सुक्या खोबऱ्याचे करा झटपट पौष्टीक लाडू; हाडांची दुखणी होतील दूर

Super EASY 10 Minutes Coconut Ladoo | Nariyal Laddu Recipe : कंबरदूखीवर उत्तम उपाय - रोज एक खोबऱ्याचे लाडू खा; शरीर राहील सुदृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2024 10:00 AM2024-08-08T10:00:00+5:302024-08-08T10:00:02+5:30

Super EASY 10 Minutes Coconut Ladoo | Nariyal Laddu Recipe : कंबरदूखीवर उत्तम उपाय - रोज एक खोबऱ्याचे लाडू खा; शरीर राहील सुदृढ

Super EASY 10 Minutes Coconut Ladoo | Nariyal Laddu Recipe | ना साखर- ना गॅस, कपभर सुक्या खोबऱ्याचे करा झटपट पौष्टीक लाडू; हाडांची दुखणी होतील दूर

ना साखर- ना गॅस, कपभर सुक्या खोबऱ्याचे करा झटपट पौष्टीक लाडू; हाडांची दुखणी होतील दूर

आजकाल प्रत्येकाला हाडांच्या समस्या भेडसावतात (Cooking Tips). कमी वयातही लोकांना कंबरदुखी, गुडघेदुखी, अंगदुखीच्या वेदना जाणवतात. ज्यामुळे शारीरिक काम करताना, थकवा जाणवतो (Food). बिघडलेल्या जीवनशैलीमुळे तब्येतीकडे दुर्लक्ष होते. जर शरीराला पौष्टीक घटक मिळाले नाही तर, गंभीर आजारांचा धोका वाढतो (Coconut). त्यामुळे आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करायला हवा. पण नियमित पौष्टीक घटक शरीराला मिळणे गरजेचं आहे.

जर आपल्याला आहारातून पौष्टीक घटक मिळत नसेल तर, खोबऱ्याचे लाडू खा. नारळामध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाडं मजबूत, दुखणे दूर आणि आरोग्यही सुदृढ राहते(Super EASY 10 Minutes Coconut Ladoo | Nariyal Laddu Recipe).

खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य


सुकं खोबरं

काजू

डाळ - तांदूळ भिजत न घालता आप्पे करायचेत? कपभर उरलेला भात घ्या - १० मिनिटात गुबगुबीत आप्पे करा

बदाम

मनुके

खजूर

वेलची पूड

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप सुकं खोबऱ्याचे तुकडे घाला आणि फिरवून घ्या. जर आपल्याला खोबरं किसायचं नसेल तर, ही युक्ती आपल्याला मदत करेल. खोबऱ्याचा किस बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात एक कप काजू, एक कप बदाम, एक कप मनुके, ९ ते १० खजूर घालून वाटून घ्या.

शरीरातील टॉक्सिन्स कमी करण्यासाठी तासाभरात कुणी किती प्यावं? जास्त पाणी पिणंही ठरू शकतं घातक..

तयार वाटलेलं ड्रायफ्रुट्सचं मिश्रण खोबऱ्याच्या मिश्रणात घाला. नंतर त्यात अर्धा चमचा वेलची पूड घालून हाताने सर्व साहित्य एकजीव करा, व हातावर थोडे मिश्रण घेऊन लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे खोबऱ्याचे लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. हे लाडू व्यवस्थित स्टोर करून ठेवल्यास महिनाभर टिकतात.

Web Title: Super EASY 10 Minutes Coconut Ladoo | Nariyal Laddu Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.