Join us  

सँडविच, तेही ब्रेडशिवाय ? शेफ कुणाल कपूर सांगतोय खास सिक्रेट रेसिपी, सँडविच होईल सॉफ्ट व पौष्टिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 9:43 AM

Sandwich without Bread, Breakfast Recipe : शेफ कुणाल कपूरने सांगितलेले पौष्टिक ब्रेडशिवाय तयार होणारे हेल्दी सँडविच नक्कीच एकदा ट्राय करून पहा...

सँडविच म्हटलं की ते सगळ्यांच्या आवडीचं असतंच. आपण काहीवेळा सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टी टाईमला सँडविच आवडीने खातो. ब्रेडला  चटणी, बटर लावून त्यात काकडी, टोमॅटो, बीट, बटाटा घालून हे पौष्टिक सँडविच खाण्यासाठी तयार असते. परंतु सध्याच्या बदलत्या काळानुसार सगळेच आपल्या आरोग्याची अतिशय काळजी घेताना दिसून येतात. आरोग्याची काळजी घेताना आपण काहीवेळा तेलकट, तुपकट पदार्थ खाणे सोडून देतो तसेच ब्रेड देखील खाणे बंद करतो. कधी ब्रेड खावासा वाटला तर आपण व्हाईट ब्रेड न खाता हेल्दी गव्हाचा ब्राऊन ब्रेड खाणे पसंत करतो. 

सँडविच करायचे म्हटलं तर ते ब्रेड शिवाय होणे अशक्यच आहे. सँडविच करायचे म्हटलं तर आपल्याला ब्रेड हा महत्वाचा पदार्थ लागतोच. परंतु जर आपल्याला कोणी सांगितले की ब्रेडशिवाय सँडविच तयार होऊ शकते तर आपला विश्वास बसणार नाही. सुप्रसिद्ध शेफ कुणाल कपूर याने आपल्या इंस्टग्राम पेजवरून ब्रेडशिवाय हेल्दी सँडविच कसे बनवायचे याची सोपी कृती सांगितली आहे. ब्रेडशिवाय तयार होणारे हे सँडविच खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असते. तसेच जर आपण आपल्या डाएटच्या बाबतीत अगदीच काटेकोर असाल तर हे पौष्टिक ब्रेडशिवाय तयार होणारे हेल्दी सँडविच नक्कीच एकदा ट्राय करून पहा(Super Easy No Bread Sandwich Recipe For Breakfast). 

साहित्य :- 

१. बारीक रवा - २ कप २. मीठ - चवीनुसार ३. दही - १ कप ४. पाणी - दिड कप ५. तेल - ३ टेबलस्पून ६. हिंग - १ टेबलस्पून ७. लाल सुक्या मिरच्या - २ ते ३८. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून९. आलं - २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेलं)१०. मोहरी - २ टेबलस्पून ११. कडीपत्ता - ५ ते ६ पाने १२. हिरव्या मिरच्या - २ ते ३ (बारीक चिरून घेतलेल्या)१३. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरून घेतली)१४. चणा डाळ - २ टेबलस्पून १५. बेकिंग सोडा / इनो - १/२ टेबलस्पून १६. चीज स्लाइस - २ 

पावसाळ्यात करा मक्याचा ढोकळा, भुट्टा खाण्याची चटपटीत मजा - करा मस्त हलका जाळीदार ढोकळा...

पावसाळ्यात मातीच्या भांड्यांना बुरशी लागल्याने पोट खराब होण्याचा धोका, १ सोपी पद्धत- भांडी होतील स्वच्छ... 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक रवा घेऊन त्यात दही, पाणी, चवीनुसार मीठ घालावे. हे सर्व सर्व मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. २. आता एका छोट्या पॅनमध्ये चमचाभर तेल घेऊन त्यात हिंग, लाल सुक्या मिरच्या, पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, बारीक चिरून घेतलेलं आलं, मोहरी, कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून किमान २ ते ३ मिनिटे तेलात व्यवस्थित टॉस करून घ्यावे. ३. त्यानंतर ही खमंग तयार झालेली फोडणी रव्याच्या तयार करून घेतलेल्या मिश्रणात घालावी. आता या मिश्रणात बेकिंग सोडा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

पावसाळ्यात खायला हवीच बाजरीची खिचडी ! पारंपरिक - अस्सल मराठी पौष्टिक पदार्थ, करून पाहा...

सकाळचा पहिला चहा बिघडला-पांचट झाला तर मूड जातोच, ४ टिप्स- चहा होईल फक्कड...

४. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळून एकजीव करून घ्यावे. ५. त्यानंतर सँडविच बनवण्याचे टोस्टर घेऊन त्या टोस्टरमध्ये चमचाभर तेल घालून घ्यावे. तेल घातल्यानंतर या टोस्टरमध्ये हे तयार मिश्रण घालावे. मिश्रण घातल्यानंतर त्यावर चीजचे पातळ स्लाइस ठेवून पुन्हा थोडे बॅटर घालून घ्यावे.  ६. आता हे सँडविच तयार होण्यासाठी दोन्ही बाजुंनी टोस्टर व्यवस्थित गरम करून सँडविच शेकून घ्यावे. ७. १० ते १५ मिनिटे हे सँडविच शेकून घेतल्यानंतर टोस्टरच्या बाहेर काढून घ्यावे. 

आता हे सँडविच कापून टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

टॅग्स :अन्नपाककृती