Lokmat Sakhi >Food > उपवास करुन खूप थकवा आला? भरपूर एनर्जी देणारा 'हे' सुपरहेल्दी ज्यूस प्या! येईल झटपट ताकद

उपवास करुन खूप थकवा आला? भरपूर एनर्जी देणारा 'हे' सुपरहेल्दी ज्यूस प्या! येईल झटपट ताकद

Health Tips For Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासामुळे (Navratri 2024) अंगातली ताकद थोडी कमी झाल्यासारखी वाटत असेल तर लगेचच हा एक खास ज्यूस करून प्या, भरपूर एनर्जी मिळेल..(special energy drink for navratri fast)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 06:02 PM2024-10-08T18:02:25+5:302024-10-08T19:44:56+5:30

Health Tips For Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासामुळे (Navratri 2024) अंगातली ताकद थोडी कमी झाल्यासारखी वाटत असेल तर लगेचच हा एक खास ज्यूस करून प्या, भरपूर एनर्जी मिळेल..(special energy drink for navratri fast)

super healthy juice for navratri fast, best juice for navratri fast, special energy drink for navratri fast | उपवास करुन खूप थकवा आला? भरपूर एनर्जी देणारा 'हे' सुपरहेल्दी ज्यूस प्या! येईल झटपट ताकद

उपवास करुन खूप थकवा आला? भरपूर एनर्जी देणारा 'हे' सुपरहेल्दी ज्यूस प्या! येईल झटपट ताकद

Highlights हा ज्यूस केवळ उपवासाच्या दिवशीच नाही, तर एरवीही तुम्ही नाश्त्याच्या ऐवजी घेऊ शकता.

नवरात्रोत्सवानिमित्त अनेक घरांमध्ये उपवास केले जातात. नऊ दिवस सलग उपवास केल्यामुळे अनेक जणांना मग शेवटी शेवटी थोडा अशक्तपणा जाणवू लागतो. थोडं जास्तीचं काम झालं तरी गळून गेल्यासारखं वाटू लागतं. तुमच्याही बाबतीत असं झालं असेल तर दिवसाची सुरुवात हा एक छान ड्रायफ्रुट मिल्कशेक पिऊन करा (super healthy juice for navratri fast). हा ज्यूस केवळ उपवासाच्या दिवशीच नाही, तर एरवीही तुम्ही नाश्त्याच्या ऐवजी घेऊ शकता. लहान मुलांना देण्यासाठीही हा ज्यूस किंवा ड्रायफ्रुट मिल्कशेक एक उत्तम पर्याय ठरू शकतो.(special energy drink for navratri fast)

सुपरहेल्दी ड्रायफ्रुट मिल्कशेक करण्याची रेसिपी 

 

साहित्य

अर्धे सफरचंद

१ केळ

अर्धी वाटी बदाम, अक्रोड, मनुका, पिस्ता असा सुकामेवा

कशाला हवेत महागडे डी- टॅन आणि फेसपॅक? केळीचं साल घेऊन 'हा' उपाय करा- चेहरा चमकेल

अर्धी वाटी मखाना

२ ते ३ खजूर

दिड कप दूध

 

कृती

सगळ्यात आधी तर सफरचंदाच्या साली काढून ते बारीक चिरून घ्या. केळीचेही काप करून घ्या.

जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

त्यानंतर सफरचंदाचे तुकडे, केळीचे काप, सुकामेवा, खजूर, मखाना मिक्सरच्या भांड्यात टाका आणि बारीक करून घ्या. 

या मिश्रणामध्ये आता थोडं दूध टाका आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या.

 

या ज्यूसमध्ये खरंतर साखर टाकण्याची गरज नाही. पण तुम्हाला खजूर उष्ण होत असतील तर त्याऐवजी तुम्ही साखर टाकू शकता. 

पाहा संत्री- मोसंबीच्या सालींचे तुम्ही विचारही केला नसेल एवढे भन्नाट उपयोग, ६ खास टिप्स...

हा मिल्कशेक दिवसातून एकदाच घ्या. सकाळी नाश्ता न करता हा मिल्कशेक घेतला तरी उत्तम. यातून भरपूर प्रमाणात एनर्जी मिळेल. शिवाय उपवासामुळे ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर तो देखील कमी होण्यास मदत होईल. 


 

Web Title: super healthy juice for navratri fast, best juice for navratri fast, special energy drink for navratri fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.