पिझ्झा हा असा पदार्थ आहे की तो घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. वेगवेगळे टॉपिंग्स आणि भरपूर चीझ घालून केलेला चिझी पिझ्झा (pizza lover) म्हणजे तर पिझ्झाप्रेमींसाठी निव्वळ सुख.. पण कितीही पिझ्झा आवडत असला आणि पिझ्झा खाण्याची लहर कधीही येत असली, तरी हेल्थ कॉन्शस असणारे लोक मात्र पिझ्झा ( healthy pizza recipe by Hrithik Roshan) खाणं टाळतात. कारण पिझ्झा बेस हा मैद्याचा असतो आणि मैदा खाण्याचे दुष्परिणाम आपल्याला माहिती आहेतच (How to make healthy pizza?).
त्यामुळे मग आवडत असूनही अनेक जण पिझ्झापासून दूर राहतात. पण आता बॉलीवूडचा जबरदस्त फिट अभिनेता ऋतिक रोशनच पिझ्झा खातो आहे, म्हटल्यावर त्याचा पिझ्झा नेमका आहे तरी कसा, हे जाणून घेण्याची उत्सूकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहेच.
न बिघडणाऱ्या चकलीची परफेक्ट रेसिपी! तळण्यासाठी तेलही लागेल कमी, करून बघा
ऋतिकने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीमध्ये त्याने पिझ्झाचा एक फोटो शेअर केला होता. पिझ्झावरचं जबरदस्त टॉपिंग पाहून तो निश्चितच चवदार, यम्मी असणार असं वाटतं. पण या पिझ्झाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे "Can't get any healthy than this" अशा शब्दांत त्याने पिझ्झाचं वर्णन केलं आहे.
आता हा हेल्दी पिझ्झा त्याने केला असा, असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. त्याचंही उत्तर ऋतिकने त्याच्या या पोस्टमध्ये दिलं आहे. पिझ्झासाठी वापरलेल्या सगळ्या साहित्याची यादीच त्याने दिली आहे.
बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल
पिझ्झाचा बेस ब्रोकोली, कडधान्ये, रोस्टोड टोमॅटो आणि बेसिल सॉस यांच्यापासून तयार झाला असून टॉपिंग्ससाठी त्याने कांदा, बेल पेपर, चेरी टोमॅटो यांचा वापर केला आहे.