Join us

मशिनशिवाय घरीच करा गाड्यावर मिळतो तसा उसाचा रस, थंडगार रसाची इन्स्टंट रेसिपी - वाटेल फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 19:15 IST

Super Tasty sugarcane juice at home : How to Make Sugarcane Juice with a blender : Homemade Sugarcane Juice-without machine recipe : उसाचा रस आता घरच्याघरीच करणे झाले सोपे, प्या हवा तितका मनसोक्त कधीही...

उन्हाळ्यांत आपल्याला वारंवार काहीतरी थंडगार खाण्यापिण्याची इच्छा होतेच. अशावेळी आपल्या समोर थंडगार उसाच्या रसाचा ग्लास असेल तर आपण अगदी मिनिटभरात (Super Tasty sugarcane juice at home) तो घटाघटा पिऊन संपवतो. उन्हाळ्यात उसाचा रस पिण्यासारखे दुसरे कोणतेही सुख नाही. उन्हाळ्यात ताजा, थंडगार उसाचा रस प्यायल्यावर (How to Make Sugarcane Juice with a blender) खूप बरं वाटतं. थकवा कमी होऊन उत्साह वाढतो( Homemade Sugarcane Juice-without machine recipe).

उसाचा रस प्यायचं म्हटलं तर आपल्याला गुऱ्हाळात जावं लागतं. परंतु उसाचा रस पिण्यासाठी  प्रत्येकवेळी गाड्यावर जाणे शक्य होत नाही. अशा परिस्थतीत, घरच्याघरीच मोठ्या मशीन शिवाय देखील आपण उसाचा रस करु शकतो. घरच्याघरीच मशिनशिवाय गाड्यावर विकत मिळतो तसाच उसाचा रस कसा करायचा याची सोपी आणि झटपट रेसिपी पाहूयात.   

साहित्य :- 

१. ऊस - २ कप (मध्यम आकाराचे लहान तुकडे)२. बर्फाचे खडे - ३ ते ४ खडे ३. साखर - चवीनुसार ४. आल्याचा तुकडा - १ छोटा तुकडा  ५. पुदिन्याची पाने - ४ ते ५ पानं ६. काळे मीठ - चिमूटभर ७. पाणी - गरजेनुसार 

उन्हाळा स्पेशल थंडगार - चटपटीत रायत्याचे ७ प्रकार ! जेवण होईल झक्कास - पोटाला मिळेल नैसर्गिक थंडावा....

कलिंगड चिरणे म्हणजे किचकट काम? पाहा १ भन्नाट ट्रिक, एक मिनिटात फोडीच फोडी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी ऊस स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्याचे लहान किंवा मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. २. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ऊसाचे तुकडे, बर्फाचे खडे, गरज वाटल्यास चवीनुसार साखर, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने घालावीत.    

३. मिक्सरच्या भांड्यातील सगळे मिश्रण एकत्रित मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस काढून घ्यावा. ४. मिक्सरच्या भांड्यातील तयार ऊसाचा रस एका ग्लासात काढून वरून चिमूटभर काळे मीठ भुरभुरवून पिण्यासाठी सर्व्ह करावा. 

अशाप्रकारे आपण गाड्यावर मिळतो अगदी तशाच चवीचा उसाचा रस घरच्याघरीच करून पिऊ शकतो.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल