वरण भाताबरोबर चटणी किंवा लोणचं काहीतरी खायला असावं असं वाटतं. (Cooking Hacks) नेहमीच तेच तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खावंसं वाटतं अशावेळी जेवण इंटरेस्टिंग बनवण्यासाठी तुम्ही सुरणाचे कुरकुरीत काप बनवू शकता. हे काप बनवणं अगदी सोपं आहे. (Suran Kaap Recipe kase karayche) सुरणाचे काप करायला सोपे असून अगदी कमीत कमी वेळात तयार होतात. सुरणाचे काप करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make Surnache Kap) याला सुरण फ्राय असेही म्हणतात. (Suranache kaap recipe in marathi)
सुरणाचे काप करण्याची परफेक्ट पद्धत (Surnache Kap Karnyachi sopi Recipe)
१) हाताच्या तळव्याला थोडं तेल लावून सुरणाची टोकं कापून घ्या आणि सालं काढून घ्या. नंतर सुरीच्या साहाय्यााने पातळ काप करून घ्या. ही रेसिपी बनवणं खूपच सोपं असून हे काप खूपच स्वादीष्ट बनतात.
२) सुरणाचे काप तयार झाल्यानंतर मॅरिनेट करून घ्या. यासाठी चमचाभर मीठ, चमचाभर हळद आणि १-२ चमचे लिंबाचा रस घाला. सुरण मॅरिनेट करणं गरजेचं असतं कारण त्यामुळे घशात खवखव होत नाही. अन्यथा सुरण खाल्ल्यामुळे घशात खवखव होण्याचा त्रास जाणवतो.
१५ मिनिटांत बनेल १ किलो मुरमुऱ्याचा चिवडा, जराही मऊ होणार नाही-घरीच जमेल परफेक्ट खमंग चिवडा
३) सुरणाच्या कोटींगसाठी एका ताटात १ वाटी रवा, २-३ चमचे तांदूळाचे पीठ एकजीव करून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट घालून एकजीव करून घ्या. सुरणाचे स्लाईस मॅरिनेट झाल्यानंतर रव्याच्या मिश्रणात घोळवून घ्या. चवीसाठी तुम्ही यात मीठ आणि तिखटाचे प्रमाण वाढवू शकता. सर्व सुरणांच्या कापांना रव्याचे मिश्रण लावून ते बाजूला ठेवून द्या.
४) गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यात थोडं तेल घालून सुरणाचे काप शेलो फ्राय करून घ्या. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर हे काप पलटून घ्या. एकाच बाजूने जास्तवेळ शिजवल्यामुळे रव्याचे काप आणि तांदळाचे कोटींग जळू शकते. म्हणूनच मंद आचेवर तळून घ्या.
पोह्याचा चिवडा ना मऊ पडणार, ना आकसणार; चटकदार पातळ पोहा चिवड्याची सोपी रेसिपी
५) गरज लागेल तसतसं थोडं थोडं तेल घालून सुरण तळून घ्या. ५ ते १० मिनिटांनी सुरण व्यवस्थित शिजल्यानंतर एका ताटात काढून घ्या. तयार आहेत गरमागरम सुरणाचे काप. हे काप तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातबरोबर खाऊ शकता.