Lokmat Sakhi >Food > फक्त पिझ्झा, पास्तावर भुरभुरवून खाण्यासाठी नव्हे तर, हे आहेत ओरेगॅनो खाण्याचे ५ फायदे ...

फक्त पिझ्झा, पास्तावर भुरभुरवून खाण्यासाठी नव्हे तर, हे आहेत ओरेगॅनो खाण्याचे ५ फायदे ...

5 Health Benefits of Oregano : The Multiple Health Benefits of Oregano : पिझ्झा सोबत इवलुशा पाकीटात मिळणारे ओरेगॅनो खाण्याचे आश्चर्यकारक फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 07:37 PM2024-07-02T19:37:22+5:302024-07-02T19:52:52+5:30

5 Health Benefits of Oregano : The Multiple Health Benefits of Oregano : पिझ्झा सोबत इवलुशा पाकीटात मिळणारे ओरेगॅनो खाण्याचे आश्चर्यकारक फायदे...

Surprising health benefits of oregano Not just pizza, here are 5 reasons why you need to add oregano to your diet 5 Health Benefits of Oregano | फक्त पिझ्झा, पास्तावर भुरभुरवून खाण्यासाठी नव्हे तर, हे आहेत ओरेगॅनो खाण्याचे ५ फायदे ...

फक्त पिझ्झा, पास्तावर भुरभुरवून खाण्यासाठी नव्हे तर, हे आहेत ओरेगॅनो खाण्याचे ५ फायदे ...

आपण पिझ्झा ऑर्डर केला की त्यासोबत छोट्याशा पॅकेटमध्ये मिळणार ओरेगॅनो (Oregano) पिझ्झाची चव वाढवत. पिझ्झा आणि पास्तासोबत खाल्लं जाणार ओरेगॅनो हे चवीला फारच छान लागत. अनेक पदार्थांमध्ये ओरेगॅनो घातल्याने त्या डिशची चव अनेक पटींनी वाढते. ओरेगॅनो दिसताना तुळशी आणि पुदिन्याच्या पानांप्रमाणेच दिसते. खरतरं, ओरेगॅनो खाण्याचे अनेक फायदे आहेत. आतापर्यंत आपल्याला फक्त पिझ्झा, पास्ता, सँडविच यांची चव वाढवण्यासाठी ओरेगॅनो खाल्ले जाते इतकेच माहित होते. परंतु हे खाल्ल्याने त्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात(Surprising health benefits of oregano).

ओरेगॅनो हे एक अतिशय गुणकारी वनस्पती आहे.  याचा वापर अनेक ठिकाणी आयुर्वेदिक उपचारासाठी करण्यात येतो. या वनस्पतीचा उपयोग हा शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी देखील केला जातो. विदेशी मसाला म्हणून ओरेगॅनोची ओळख असली तरी आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. आतापर्यंत (Not just pizza, here are 5 reasons why you need to add oregano to your diet) आपण फक्त चटपटीत पदार्थांची चव वाढवण्यासाठी ओरेगॅनो खाल्ले असेल परंतु त्याचे आणखी काही आश्चर्यकारक फायदे माहिती करुन घेऊयात(Health Benefits of Oregano).

ओरेगॅनो खाण्याचे काय आहेत फायदे ?

१. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी :- 

ओरेगॅनो खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास अधिक मदत मिळते. ओरेगॅनोमध्ये अनेक पोषक तत्व असतात. विटामिन ए, विटामिन सी आणि विटामिन ई चे प्रमाण यात जास्त असते. या तिन्ही विटामिन्सना प्रभावी अँटिऑक्सिडंट्स मानले जाते. हे विटामिन्स शरीरारातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घेऊन त्यात ओरेगॅनोची पाने घालून उकळवा आणि हे पाणी प्या. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...

२. जळजळीपासून आराम :- 

ओरेगॅनोमध्ये दाहक - विरोधी गुणधर्म असतात. यामुळे ओरेगॅनोचे तेल हे अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापरले जाऊ शकते. NCBI ने प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की या तेलाच्या वापरामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर त्यामध्ये असलेले Carvacrol तत्व अल्सरची जळजळ कमी करण्यात आणि जखम भरून काढण्यासाठी देखील मदत करतात. 

३. हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर :- 

हाडे निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. यामध्ये सर्वातआधी कॅल्शियमचे नाव येते आणि ओरेगॅनोच्या पानांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. याव्यतिरिक्त ओरेगॅनोच्या पानांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅंगनीज हे देखील अधिक प्रमाणात असतात. यासोबतच ओरेगॅनोमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के ही हाडांसाठी फायदेशीर जीवनसत्त्वे असतात. ओरेगॅनोच्या पानांमध्ये असणारे हे इतर पोषक घटक हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात. 

४. त्वचेसाठी फायदेशीर :- 

ओरेगॅनोचे तेल त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. जे संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारतात. ओरेगॅनोच्या तेलाने मालिश केल्यास त्वचेच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिक भर पडते. 

वजन तर कमी केलं पण ते पुन्हा वाढू नये म्हणून ४ सोप्या टिप्स, वजन वाढणार नाही...

५. अशक्तपणापासून आराम मिळेल :- 

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया होतो. लोह शरीरात हिमोग्लोबिन तयार करते. जे एक प्रकारचा प्रथिने आहे. अ‍ॅनिमिया ग्रस्त व्यक्तींनी ओरेगॅनोच्या पानांचे सेवन केले पाहिजे. ओरेगॅनोच्या पानांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. यासाठी ओरेगॅनोची कोरडी पाने पाण्यात उकळून ते पाणी पिणे फायदेशीर ठरते.

Web Title: Surprising health benefits of oregano Not just pizza, here are 5 reasons why you need to add oregano to your diet 5 Health Benefits of Oregano

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.