Lokmat Sakhi >Food > मकाई ढोकळ्याची संजीव कपूर स्टाईल रेसिपी, करा हा ढोकळा.. मऊ, मस्त, आणि मक्याचा !

मकाई ढोकळ्याची संजीव कपूर स्टाईल रेसिपी, करा हा ढोकळा.. मऊ, मस्त, आणि मक्याचा !

ढोकळा तर आपल्याला माहिती आहे आणि आपण पुष्कळदा करतही असतो. पण आता मकाई ढोकळा, हा कसला नवा प्रकार आहे बरं ? मक्याचं पीठ वापरून केलेला हा मऊ मऊ लुसलुशीत ढोकळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 07:44 PM2021-07-09T19:44:13+5:302021-07-09T19:54:04+5:30

ढोकळा तर आपल्याला माहिती आहे आणि आपण पुष्कळदा करतही असतो. पण आता मकाई ढोकळा, हा कसला नवा प्रकार आहे बरं ? मक्याचं पीठ वापरून केलेला हा मऊ मऊ लुसलुशीत ढोकळा..

Sweet corn dhokla perfect recipe by Sanjeev Kapoor, tasty and healthy | मकाई ढोकळ्याची संजीव कपूर स्टाईल रेसिपी, करा हा ढोकळा.. मऊ, मस्त, आणि मक्याचा !

मकाई ढोकळ्याची संजीव कपूर स्टाईल रेसिपी, करा हा ढोकळा.. मऊ, मस्त, आणि मक्याचा !

Highlightsएरवी ढोकळा करताना आपण हरबऱ्याच्या डाळीचे पीठ वापरतो. डाळीच्या पीठाने अनेक जणांना त्रासही होतो. मकाई ढोकळा मात्र मका आणि रवा यांच्यापासून बनलेला असल्याने अधिक पौष्टिक असतो.

ढोकळा हा गुजराती पदार्थ संपूर्ण भारतातच मोठ्या आवडीने खाल्ला जातो. कधीही कुणालाही ढोकळा खाण्याची लहर येऊ शकते. शिवाय करायला सोपा आणि पटकन होणारा. त्यामुळे कमी मेहनतीमध्ये होणारा मस्त आणि हलका- फुलका पदार्थ. पण आता सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी या ढोकळ्याचं नविन व्हर्जन आणलंय बरं का.. मकाई ढोकळा. हा पदार्थ तर चवीला झकास आहेच पण आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेणारा आहे.

 

मकाई ढोकळा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
एक कप उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे, एक कप रवा, अर्धा कप दही, हळद, मीठ, एक चमचा तेल, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, अर्धा टी स्पून इनो.

 

मकाई ढोकळा बनविण्याची कृती
१. सगळ्यात आधी तर मक्याचे उकडलेले दाणे मिक्सरमधून काढा आणि त्याची अगदी मऊसर पेस्ट बनवा.
२. मक्याच्या दाण्यांची पेस्ट एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. यामध्ये रवा, दही, मीठ आणि हळदही टाका. 
३. सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्या. यानंतर आता थोडे थोडे पाणी टाकून नेहमीप्रमाणे ढोकळा करताना जसे पातळ पीठ भिजवतो, तसे पीठ भिजवून घ्या. 


४. यानंतर तेल तापवून त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने टाकून फोडणी करून घ्या आणि ही फोडणी पीठात मिक्स करा.
५. त्यानंतर सगळ्यात शेवटी इनो टाका आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या.
६. आता नेहमीप्रमाणे जसा तुम्ही ढोकळा लावता, तसा ढोकळा करायला ठेवून द्या. 
७. ७ ते ८ मिनिटांत मस्त, वाफाळता गरमागरम ढोकळा तयार होईल.

 

Web Title: Sweet corn dhokla perfect recipe by Sanjeev Kapoor, tasty and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.