मस्त वाफवलेले स्वीटकॉर्न आणि बाहेर भुरभुरणारा पाऊस हे कॉम्बिनेशन तर पावसाळ्यात (food and recipe for monsoon) झालंच पाहिजे. त्याशिवाय पावसाची मजा नाही. कुणाला भाजलेलं मक्याचं कणिस (sweet corn) आवडतं तर कुणाला मस्त वाफवलेले स्वीटकॉर्न. दोन्ही पदार्थांची आपली आपली खास चव. पण तरीही घरच्या उकडलेल्या स्वीटकॉर्नला (How to boil sweet corn) हॉटेलसारखी खास चव येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. तुम्हालाही असंच वाटत असेल आणि तुम्ही पण स्वीटकॉर्न पाणी घालून उकडत असाल, तर स्वीटकॉर्न उकडण्याची योग्य पद्धत कोणती, याविषयीचा हा व्हिडिओ एकदा बघायलाच हवा.
अर्थात कोणताही पदार्थ जेव्हा उकडायचा असतो, तेव्हा त्यात पाणी घालावंच लागतं. आपणही स्वीटकॉर्नमध्ये पाणी घालणार आहोत. पण ते कशा पद्धतीने घातलं जातं, हे बघणं महत्त्वाचं ठरतं. अनेक जणी स्वीटकॉर्नचे दाणे पुर्णपणे सोलून घेतात आणि नंतर ते पाणी टाकून उकडतात. किंवा काही जणी कणिस पुर्णपणे सोलून घेऊन मग ते पाण्यात ठेवून उकडतात. अशा दोन्ही पद्धती चुकीच्या आहेत. यामुळे स्वीटकॉर्नची चव तर बिघडतेच, पण त्यातली पोषण मुल्येही कमी होत जातात. त्यामुळेच स्वीटकॉर्न उकडण्याची योग्य पद्धत माहिती असावी.
स्वीटकाॅर्न खाण्याचे फायदे (Benefits of sweet corn)
१. स्वीटकॉर्न खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात.
२. मुतखडा म्हणजेच किडनीस्टोनसाठी स्वीटकॉर्न अतिशय गुणकारी ठरतो.
३. स्वीटकॉर्नमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी स्वीटकॉर्न खाणे फायद्याचे आहे. फॉलिक ॲसिडमुळे कर्करोगाचाही धोका कमी होत असतो.
भाजीत मसाले घालताना द्या लहानसा ट्विस्ट, नेहमीची भाजी होईल चमचमीत- हॉटेलच्या भाज्यांपेक्षा भारी
४. स्वीटकॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. स्वीटकॉर्न जर शिजवून खाल्ले तर त्यातील ॲण्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण दुपटीने वाढते. त्यामुळे सौंदर्यासाठीही स्वीटकॉर्न खायलाच हवेत.
५. मॅग्नेशियम, लोह, कॉपर, विटामिन बी, फॉस्फरस असे घटक स्वीटकाॅर्नमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे अशक्तपणा घालविण्यासाठी स्वीटकॉर्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
स्वीटकॉर्न उकडण्याची योग्य पद्धत
- स्वीटकॉर्न उकडण्यासाठी सगळ्यात आधी त्याच्यावर असणारी आवरणं म्हणजेच सालं काढून टाका. पण असं करताना एक काळजी घ्या. कधीच स्वीटकॉर्नचे सगळे सालं काढून टाकायचे नाहीत. शेवटची एक किंवा दोन आवरणं तशीच ठेवायची.
- त्यानंतर त्याच्या एका टोकाला रेशमी दोऱ्यासारखे काही धागे असतात. हे धागेदेखील कापून टाका.
- बरेच जणं स्वीटकॉर्न उकडण्यापुर्वी धुवून घेत नाहीत. पण ते स्वच्छ करण्याची गरज असतेच. म्हणून हे सोललेलं कणिक धुवून घ्या. त्यासाठी एका भांड्यात पाणी टाका. त्यात एक टेबलस्पून मीठ टाका. त्यात काही वेळ कणिस बुडवून ठेवा. त्यानंतर हाताने स्वच्छ करून घ्या. मीठाच्या पाण्यामुळे कणिक अधिक स्वच्छ होईल.
- आता धुवून घेतलेलं कणिस एका भांड्यामध्ये ठेवा. साधारण ४ ते ५ कणसं असतील तर एक ते दिड टेबल स्पून मीठ घाला. त्यात पाणी घाला आणि भांड्यावर झाकण ठेवून ते गॅसवर १० मिनिटांसाठी ठेवून द्या. १० मिनिटांनंतर स्वीटकॉर्नचा रंग अधिक पिवळट सोनेरी झालेला दिसेल. आता एकदा झाकण काढून एखाद्या कणसावरचं आवरणं बाजूला काढून दाणे शिजले की नाही ते एकदा तपासून घ्या.
- उकडलेलं कणिस थंड झालं की त्यावरची सालं काढून टाका आणि गरमागरम बॉईल स्वीटकॉर्नचा आनंद घ्या.