Join us  

ऐन थंडीत करा पिवळ्या धम्मक मक्याचे पराठे, मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ-एक काय चार खा बिंधास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2024 5:22 PM

Sweetcorn Cheese Paratha Recipe : How To Make Corn Cheese Paratha Recipe At Home : पिवळ्या धम्मक मक्याच्या दाण्यांचे पराठे म्हणजे थंडीत मेजवानीच...

सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. सगळीकडे गुलाबी थंडी पडू लागली आहे. या थंडीच्या दिवसांत बाजारात पिवळी धम्मक टपोऱ्या दाण्यांची मक्याची कणसं विकायला ठेवलेली असतात. ही पिवळी, गोड मक्याच्या दाण्यांची कणसं पाहून अगदी पटकन उचलून खावीशी वाटतात. अशी कणसं आपण घरी विकत आणतो. ही मक्याची कणसं आपण भाजून त्यावर लिंबू मीठ - मसाला लावून अगदी ताव मारत तर खातोच. परंतु या मक्याच्या दाण्यांपासून आपण वेगवेगळे पदार्थ देखील तयार करतो(Sweetcorn Cheese Paratha Recipe).

मक्याच्या दाण्यांचे पॅटिस, टिक्की, कॉर्न भेळ असे अनेक पदार्थ खातो. पण याच मक्याच्या दाण्यांपासून आपण झटपट तयार होणारा पराठा देखील तयार करु शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून आपण हा पराठा बनवू शकतो. हा पौष्टिक पराठा आपण सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. एवढंच नव्हे तर लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा टी टाइमला लागणाऱ्या छोट्याशा भुकेसाठी म्हणून आपण हा पराठा करू शकतो. फक्त कपभर मक्याचे दाणे वापरुन पटकन पराठा कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Corn Cheese Paratha Recipe At Home).

साहित्य :- 

१.गव्हाचे पीठ - १ कप २. मैदा - १/४ कप ३. मीठ - चवीनुसार ४. ओवा - १ टेबलस्पून ५. तेल - ३ ते ४ टेबलस्पून ६. पाणी - गरजेनुसार .७. मक्याचे दाणे - १ कप ८. कोथिंबीर - ४ ते ५ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)९. बेसन - १/२ कप १०. चीझ क्यूब - १ क्यूब११. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून १२. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून १३. ऑरेगॅनो - १ टेबलस्पून 

बटाटे उकडण्यापासून लसूण सोलण्यापर्यंत स्वयंपाकघरातल्या ‘या’ ९ कामांसाठी मायक्रोवेव्हचा करा वापर, स्वयंपाक होईल झटपट

बटाटे नीट उकडत नाहीत? पाहा 'ही' योग्य पद्धत, हातही न लावता सोला बटाटे झटपट

कृती :- 

१. सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, चवीनुसार मीठ, ओवा, तेल घालून घ्यावे. त्यानंतर गरजेनुसार पाणी ओतून कणीक मळून घ्यावे. २. आता मिक्सरच्या भांड्यात मक्याचे दाणे घेऊन ते हलकेच बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. ३. मक्याच्या दाण्यांची तयार पेस्ट एका बाऊलमध्ये घेऊन त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, किसून घेतलेलं चीझ, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो घालावे. आता हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्स करून पराठ्यासाठीचे सारण तयार करून घ्यावे. 

वाळून कडक झालेले डाळिंब सोलण्याची ट्रिक, दाणे निघतील सरसर आणि रसही गळणार नाही...

४. आता मळून ठेवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. यातील एक गोळा घेऊन त्याला बोटांनी दाब देत खोलगट आकार द्यावा. आता यात मक्याच्या दाण्यांचे तयार सारण भरून घ्यावे. त्यानंतर याचा गोलाकार गोळा तयार करून घ्यावा. ५. आता या तयार गोळ्याचा पराठा लाटून घ्यावा. ६. गरम तव्यावर थोडेसे तेल सोडून हा पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा. 

मक्याच्या दाण्यांचा पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा गरमागरम पराठा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती