थंडीच्या दिवसांत काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते. (Cooking Hacks) अशावेळी थंड पादार्थ खाण्यापेक्षा गरमागरम काही खाल्ले जेवण जास्त जातं आणि शरीराला उष्णताही मिळते. दही ताक प्रत्येक घरांमध्ये खाल्लं जातं. (Winter Special Recipes) थंडीच्या दिवसात दही किंवा कोशिंबीर खाण्यापेक्षा ताकाची कढी खाणं लोक पसंत करतात पण कढी कधी फुटते तर कधी जास्त आंबट होते अशी अनेकांची तक्रार असते. कढी फुटू नये परफेक्ट बनवावी यासाठी कढी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Takachi Kadhi Kashi Karaychi)
ताकाची कढी बनवण्याचे साहित्य (Kadhi Making Process)
१) २ कप - ताक
२) २ टेबलस्पून- बेसन
३) १ कप- बारीक चिरलेली कोथिंबीर
४) १ चमचा- जीरं,
५) १ चमचा - मोहोरी,
६) १० ते १५ - कढीपत्त्याची पानं
७) २ चमचे - साखर,
८) १ टिस्पून- १ हिंग
९) चवीनुसार - मीठ
१०) ३ ते ४ टेबलस्पून - तेल.
कढी बनवण्याची परफेक्ट पद्धत कोणती (Takachi Kadhi Recipe in Marathi)
१) कढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ताकात २ चमचे बेसन घालून एकजीव करून घ्या. चमच्याच्या साहाय्याने घुसळून घ्या.
२) बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही जर दह्याची कढी बनवत असाल तर आधी दही घुसळून त्यात पाणी घालून पातळ करून घ्या नंतर त्यात बेसन मिसळा.
बिना साखरेचे पौष्टीक डिंकाचे लाडू करण्याची सोपी रेसिपी; मिश्रण कोरडे न होता करा परफेक्ट लाडू
३) एका कढईत तेल आणि तूप मिसळून घाला. जेणेकरून कढीला छान सुगंध येईल. त्यात राई आणि जीरं, हिंग, लसणाची पेस्ट, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. नंतर त्यात बेसन पीठ मिसळलेले ताकाचे मिश्रण घालून एकत्र करून घ्या. यात पाव टिस्पून हळद घालून चमच्याच्या साहाय्याने एकजीव करा.
५ रूपयांच्या कढीपत्त्याने घनदाट-लांब होतील केस; कढीपत्ता ३ प्रकारे लावा-भराभर वाढतील केस
४) कढी फुटू नये यासाठी चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहा. जर तुम्ही कढी व्यवस्थित ढवळली नाही तर कढी फुटू शकते. ८ ते १० मिनिटं शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.