Lokmat Sakhi >Food > तुमच्या- आमच्या घरात नेहमीच होणारा 'हा' पदार्थ, तो म्हणे जगात वाईट! बघा कोणता पदार्थ..

तुमच्या- आमच्या घरात नेहमीच होणारा 'हा' पदार्थ, तो म्हणे जगात वाईट! बघा कोणता पदार्थ..

Top 100 Worst Rated Foods In World: Tasteatlas यांनी जगभरातील १०० वाईट पदार्थांची यादी जाहीर केली असून यामध्ये बहुसंख्य भारतीयांच्या घरात होणारा एक पदार्थ पाहून भारतीय खाद्यप्रेमी चांगलेच खवळले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 12:55 PM2024-06-13T12:55:59+5:302024-06-13T18:33:04+5:30

Top 100 Worst Rated Foods In World: Tasteatlas यांनी जगभरातील १०० वाईट पदार्थांची यादी जाहीर केली असून यामध्ये बहुसंख्य भारतीयांच्या घरात होणारा एक पदार्थ पाहून भारतीय खाद्यप्रेमी चांगलेच खवळले आहेत.

tasteatlas decalred top 100 worst rated foods in world, indian food aloo baingan is in the list of worst food of world | तुमच्या- आमच्या घरात नेहमीच होणारा 'हा' पदार्थ, तो म्हणे जगात वाईट! बघा कोणता पदार्थ..

तुमच्या- आमच्या घरात नेहमीच होणारा 'हा' पदार्थ, तो म्हणे जगात वाईट! बघा कोणता पदार्थ..

HighlightsTasteatlas यांच्यावतीने जगभरातील खाद्य पदार्थांचा, खाद्य संस्कृतीचा अभ्यास केला जाताे आणि त्या अभ्यासातून समोर आलेले वेगवेगळे निष्कर्ष खवय्यांसमोर ठेवले जातात.

भारतातल्या खाद्य पदार्थांमध्ये कमालीची विविधता दिसून येते. प्रत्येक प्रांताची खाद्यसंस्कृती वेगवेगळी आहे. पण काही भारतीय पदार्थ असे आहेत की ते सगळ्या भारतातच आवडीने खाल्ले जातात. एवढंच नाही तर अगदी परदेशी खवय्येही ते पदार्थ आवडीने खातात. असाच एक पदार्थ जो जवळपास काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत बहुसंख्य घरांमध्ये तयार होताे तो म्हणजे आलू- बैंगन मसाला. किंवा वांगे- बटाट्याची भाजी. ही भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी बऱ्याच भारतीय घरांमध्ये ती होते आणि विशेष म्हणजे काही अपवाद वगळता सगळेच जण ती आवडीने खातात. पण नेमका हाच पदार्थ जगातील सगळ्यात वाईट पदार्थांच्या यादीत आलेला पाहून भारतीय खवय्ये मात्र चांगलेच चिडले आहेत. (Indian food aloo baingan is in the list of worst food of world)

 

Tasteatlas यांच्यावतीने जगभरातील खाद्य पदार्थांचा, खाद्य संस्कृतीचा अभ्यास केला जाताे आणि त्या अभ्यासातून समोर आलेले वेगवेगळे निष्कर्ष खवय्यांसमोर ठेवले जातात. त्यानुसार टेस्टॲटलास यांनी जगातल्या १०० वाईट पदार्थांची  (Top 100 worst-rated foods in the World) यादी नुकतीच जाहीर केली आहे.

गळून गळून केस पातळ झाले? खोबरेल तेलात ३ पदार्थ टाकून लावा- नवे केस भराभर उगवतील

या यादीत ६० क्रमांकावर आलू- बैंगन हा पदार्थ असून त्याला ५ पैकी २. ७ एवढं रेटिंग देण्यात आलं आहे. ते पाहून भारतीय लोकांनी अनेक मजेशीर कमेंट केल्या असून यादी तयार करणाऱ्या व्यक्तीने आलू- बैंगनची खरी चव चाखून पाहिलीच नसावी, असंही म्हटलं आहे.

 

काही जण असंही म्हणत आहेत की आलू- बैंगन हा काही वाईट पदार्थ नाहीच. पण त्यांना तो तसा वाटत असेल तर ठीक आहे.

कोथिंबीर निवडत बसायला वेळच नाही, खूप कंटाळा येतो? १ सोपी ट्रिक- आठवडाभर राहील फ्रेश 

पण त्या व्यतिरिक्त त्या यादीमध्ये अन्य कोणताही भारतीय पदार्थ नाही, ही खरोखरच खूप चांगली गोष्ट आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आईसलँण्डचा हकारल हा पदार्थ असून त्याला १.८ एवढं रेटिंग मिळालं आहे. 
 

Web Title: tasteatlas decalred top 100 worst rated foods in world, indian food aloo baingan is in the list of worst food of world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.