Lokmat Sakhi >Food > नारळाची गारेगार कुल्फी घरीच करा, पाहा खास चव, बाहेरचे टेंडर कोकोनट आईस्क्रीम विसराल

नारळाची गारेगार कुल्फी घरीच करा, पाहा खास चव, बाहेरचे टेंडर कोकोनट आईस्क्रीम विसराल

Tasty and healthy fresh coconut kulfi : एकदा नारळाची कुल्फी खाऊन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2024 12:49 PM2024-05-16T12:49:55+5:302024-05-16T17:31:40+5:30

Tasty and healthy fresh coconut kulfi : एकदा नारळाची कुल्फी खाऊन पाहा..

Tasty and healthy fresh coconut kulfi | नारळाची गारेगार कुल्फी घरीच करा, पाहा खास चव, बाहेरचे टेंडर कोकोनट आईस्क्रीम विसराल

नारळाची गारेगार कुल्फी घरीच करा, पाहा खास चव, बाहेरचे टेंडर कोकोनट आईस्क्रीम विसराल

उन्हाळा सुरु झाला की थंड पेय, कुल्फी, आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरत नाही (Kulfi). आईस्क्रीम अनेक फ्लेवर्सचे मिळतात. शिवाय कुल्फी देखील अनेक फ्लेवर्सची मिळते. कोणाला आईस्क्रीम खायला आवडते, तर कोणाला कुल्फी खाण्याचा मोह आवरत नाही. काजू, बदाम किंवा दुधाची कुल्फी आपण खातोच. पण कधी नारळाची कुल्फी खाऊन पाहिली आहे का?

नारळाचा आपण अनेक पदार्थात वापर करतो. नारळाच्या वापर पदार्थात केल्याने, जेवणाची लज्जत वाढते. पण आपण याचा वापर कुल्फी करण्यासाठीही करू शकता. नारळाची कुल्फी करायला सोपी आणि चवीलाही भन्नाट लागते. पण नारळाची कुल्फी कशी तयार करावी? पाहूयात(Tasty and healthy fresh coconut kulfi).

नारळाची कुल्फी करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

कस्टर्ड पावडर

केस गळणे-पांढरे होणे-डोक्यात कोंडा, करा कांदा-मेथीचा ‘हा’ उपाय, डोक्याचा ताप कमी

वेलची पावडर

मिल्क पावडर

डेसिकेटेड कोकोनट

अशा पद्धतीने करा चविष्ट नारळाची कुल्फी

सर्वप्रथम, गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक ग्लास दूध घाला. दूध गरम झाल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर एका वाटीत ३ चमचे कस्टर्ड पावडर घ्या. त्यात ३ चमचे पाणी घालून मिक्स करा. आता दुधात ३ चमचे साखर घालून मिक्स करा. नंतर त्यात अर्धा चमचा वेलची पावडर घालून मिक्स करा.

मेदू वडे फसतात - क्रिस्पी होत नाही? डाळ वाटताना त्यात घाला बर्फाचे तुकडे; मेदू वडे होतील परफेक्ट

एका वाटीत ३ चमचे मिल्क पावडर घ्या. त्यात ३ चमचे दूध घालून मिक्स करा. आता कढईतील दुधात कस्टर्डचं पाणी, मिल्क पावडर आणि एक बाऊल डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. आता प्लास्टिकचे कप घ्या. त्यात चमचाभर मिश्रण ओता. त्यावर ॲल्यु‍मिनियम फॉइल लावून कव्हर करा, आणि त्यावर रबर बॅण्ड लावून पॅक करा.

प्लास्टिक ग्लास आता फ्रिजरमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी फ्रिजरमधून प्लास्टिक ग्लास बाहेर काढा. त्यातून कुल्फी बाहेर काढा, व नारळाच्या कुल्फीचा आस्वाद घ्या.

Web Title: Tasty and healthy fresh coconut kulfi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.