Join us  

स्वतःला द्या शाही ट्रिट, करा ड्रायफ्रूट स्मूदी! पोटभर-पौष्टिक आणि चविष्ट, तबियत खुश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 3:00 PM

How To Make Health Drink At Home: ड्रायफ्रुट्स नेहमी तसेच खाण्यापेक्षा कधीतरी त्याची अशी भन्नाट स्मूदी (dry fruits smoothie) करून बघा.. चव अशी मस्त की एकदा पिऊन बघायलाच हवी.

ठळक मुद्देसुकामेव्याची ही स्मूदी लहान मुलांसाठीही अतिशय उत्तम हेल्थ ड्रिंक होऊ शकतं. कारण यातून सगळ्याच प्रकारचा सुकामेवा त्यांच्या पोटात जातो.

उत्तम आरोग्यासाठी सुकामेवा (Benefits of eating dry fruits) खाल्ला पाहिजे, असं डॉक्टर नेहमी सांगतात. बरेच जण नियमितपणे तो खातातही. पण बऱ्याचदा काय होतं की ज्या सुकामेव्याची चव आवडते, तेच खाल्ले जातात आणि बाकीचे मात्र तसेच पडून राहतात. घरात लहान मुलांच्या बाबतीत तर त्यांच्या आईंना नेहमीच असा अनुभव येतो. म्हणूनच लहान मुलांच्या आणि स्वत:च्याही पोटात सगळाच सुकामेवा (dry fruits smoothie recipe) थोडा थोडा जावा असं वाटत असेल, तर ही ड्रायफ्रुट स्मूदी (Perfect health drink ) एकदा करून बघा. 

 

लहान मुलांसाठीही उत्तम- सुकामेव्याची ही स्मूदी लहान मुलांसाठीही अतिशय उत्तम हेल्थ ड्रिंक होऊ शकतं. कारण यातून सगळ्याच प्रकारचा सुकामेवा त्यांच्या पोटात जातो. शिवाय याची टेस्टही मुलांना नक्कीच आवडण्यासाठी आहे.- बरीच लहान मुलं दुधामध्ये बाेर्नव्हिटा, कॉम्प्लॅन, बुस्ट असं काय काय टाकून पितात. ते नसेल तर त्यांना दूध जात नाही. दुधामध्ये असं काही टाकून देण्यापेक्षा घरी बनवलेली ड्रायफ्रुट्स स्मूदी त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.- शाळेत जाण्याआधी मुलांना नुसतं दूध देण्यापेक्षा ग्लासभर स्मूदी दिली तर ते त्यांच्या तब्येतीसाठी अतिशय लाभदायक ठरू शकतं. 

 

ड्रायफ्रुट स्मूदी रेसिपी (Food And Recipe)साहित्य प्रौढ व्यक्तींसाठी करायची असल्यास २ अंजीर, २ खजूर, ४ ते ५ मनुका, ३ ते ४ बदाम, ४ ते ५ अक्रोड, ३ ते ४ काजू, ५ ते ६ पिस्ता आणि अर्धा ग्लास दूध. लहान मुलांसाठी करत असाल तर हे प्रमाण अर्ध्याने कमी करावं. रेसिपी- सगळ्यात आधी अंजीर, खजूर आणि मनुका एक वाटी पाण्यात एक ते दिड तास भिजत ठेवाव्या.- अंजीर, खजूर आणि मनुका भिजत टाकताना थोडे धुवून घ्यावेत. जेणेकरून ते ज्या पाण्यात भिजवले ते पाणीही आपल्याला स्मूदी करण्यासाठी वापरण्यात येईल.- यानंतर भिजलेल्या मनुका, अंजीर, खजूर यासोबतच उरलेला सगळा सुकामेवा मिक्सरच्या भांड्यात टाकावा.

- मनुका, अंजीर, खजूर भिजवलेलं पाणीही मिक्सरच्या भांड्यात टाका आणि हे सगळं मिश्रण फिरवून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.- ही पेस्ट आता एका ग्लासमध्ये टाका. साधारण अर्धा ग्लास ही पेस्ट तयार होते. त्यात आता अर्धा ग्लास उकळून थंड झालेलं दूध टाका. दूध टाकल्यानंतर सगळं मिश्रण एकदा पुन्हा हलवून घ्या.

गुजराथी कॉर्न खिचडी! पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी खास गरमागरम बेत, करायला सोपी-चवीला उत्तम- पचनाला हलकी- अतिशय चवदार अशी एकदम शाही चवीची ड्रायफ्रुट्स स्मूदी झाली तयार. - स्मूदी करताना थंड दुधाचाच वापर करावा.- ही रेसिपी करताना आपण अजिबातच साखर टाकलेली नाही. यात जो काही गोडवा निर्माण झालेला आहे तो पुर्णपणे अंजीर, मनुका आणि खजूर यांचाच आहे. त्यामुळे साखर नसणारी ही रेसिपी प्रत्येकासाठीच अतिशय पौष्टिक आहे. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स