Lokmat Sakhi >Food > डाग पडून नरम झालेली केळी फेकून देता? केळ्यापासून नाश्त्याला करा खमंग कुरकुरीत पदार्थ

डाग पडून नरम झालेली केळी फेकून देता? केळ्यापासून नाश्त्याला करा खमंग कुरकुरीत पदार्थ

Tasty Banana Balls Recipe : चहाबरोबर किंवा नाश्त्याला, दुपारच्या जेवणात खायला हा उत्तम पर्याय आहे. (Cooking Tips & Hacks)

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:13 PM2023-01-20T15:13:14+5:302023-01-20T15:33:46+5:30

Tasty Banana Balls Recipe : चहाबरोबर किंवा नाश्त्याला, दुपारच्या जेवणात खायला हा उत्तम पर्याय आहे. (Cooking Tips & Hacks)

Tasty Banana Balls Recipe : How to make testy snack from banana | डाग पडून नरम झालेली केळी फेकून देता? केळ्यापासून नाश्त्याला करा खमंग कुरकुरीत पदार्थ

डाग पडून नरम झालेली केळी फेकून देता? केळ्यापासून नाश्त्याला करा खमंग कुरकुरीत पदार्थ

केळी आणल्यानंतर २ ते ३ दिवसात काळी पडायला लागतात. जर केळी वेळीच खाल्ली नाही तरी वाया जातात. केळी खाणं पचनक्रियेसाठीही उत्तम मानलं जातं.  केळी काळी पडू नयेत म्हणून त्याच्या टोकाला चिकटपट्टी लावून ठेवा. तुमच्याघरी डाग पडलेली केळी पडली असतील तर या केळींपासून कुरकुरीत खमंग, नाश्ता बनवण्याची सोपी ट्रिक पाहूया. (How to make pakoda from dark spot banana)  चहाबरोबर किंवा नाश्त्याला, दुपारच्या जेवणात खायला हा उत्तम पर्याय आहे. (Cooking Tips & Hacks)

1) सगळ्यात आधी केळी मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात साखर , दूध घाला.  

२) हे मिश्रण बारीक केल्यानंतर त्यात अर्धा कप  गव्हाचं पीठ घाला. 

३) पीठ एकजीव केल्यानंतर त्यात बडीशेप आणि बेकींग सोडा घाला.

४) आता हे मिश्रण ५ ते १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या

५) तेल मध्यम गरम करून त्यात या मिश्रणाचे भजीप्रमाणे गोळे तळून घ्या. 

Web Title: Tasty Banana Balls Recipe : How to make testy snack from banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.