दिवाळीत अनेकजण मिठाई वाटप करतात. नातलगांना, मित्रमंडळींना काही ना काही दिलं जातं. यामध्ये दोन पदार्थ अगदी आवर्जून दिले जातात. त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे सोनपापडी आणि दुसरा पदार्थ म्हणजे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स. सुकामेवा तर संपून जातो. पण सोनपापडीचं काय करावं, हा प्रश्न पडतोच. रोज रोज त्याच त्या चवीची सोनपापडी खाण्याचा कंटाळाही येतो. म्हणूनच आता सोनपापडीची खीर करण्याची ही रेसिपी बघा (how to make kheer from sonpapdi?). अगदी हा हा म्हणता तुमच्या घरातली किलोभर सोनपापडी आरामात संपून जाईल.(tasty kheer recipe from leftover sonpapdi in Diwali)
सोनपापडीची खीर करण्याची रेसिपी
साहित्य
अर्धा किलो सोनपापडी
१ लीटर दूध
फुगलेलं शरीर, सुटलेलं पोट झटपट कमी करणारं 'पिवळं' पाणी! रोज नियमितपणे प्या- पोट होईल सपाट
अर्धी वाटी साखर
२ ते ३ चमचे सुकामेव्याचे तुकडे
१ टेबलस्पून तूप
कृती
सगळ्यात आधी सोनपापडी हातानेच थोडी चुरून घ्या. वेगवेगळ्या फ्लेवरच्या सोनपापडी एकत्र केल्या तरी चालेल.
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये तूप टाका आणि सुकामेव्याचे तुकडे त्यात परतून घ्या.
बाल्कनीत कुंड्या ठेवायला जागा नाही? घरात बाटलीमध्ये पाण्यात लावा 'ही' रोपं, मातीची गरजच नाही
यानंतर कढईमध्ये दूध टाका आणि त्याच वेळी चुरलेली सोनपापडी थोडी थोडी करून टाका. सोनपापडीचा चुरा टाकताना दुधात त्याचे गोळे होणार नाहीत, याकडे लक्ष द्या. त्यामुळेच दूध वेळोवेळी हलवत राहावे.
यानंतर दुधाला उकळी येऊन ते थोडे घट्ट झाले की त्यात साखर घाला आणि पुन्हा एकदा उकळी येऊ द्या. सोनपापडीची चवदार खीर झाली तयार..