Join us  

विदेशी माणूस पडला सांबारच्या प्रेमात, त्याने सांगितलेली सांबारची चटकदार रेसिपी झाली तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2022 4:02 PM

Food And Recipe: भारतीय खाद्यपदार्थ (Indian food) आता परदेशातल्या लोकांनाही वेड लावत आहेत.. ही एक व्यक्तीही त्यातलीच. म्हणूनच तर बघा किती गाजतेय त्याची सांबार रेसिपी..(sambhar recipe by a foreigner)

ठळक मुद्देएक परदेशी व्यक्ती सांबार बनवतेय म्हटल्यावर आणखीनच उत्सूकता वाढते. म्हणूनच तर बघा ही जेक स्पेशल सांबार रेसिपी.

इडली- सांबार (idli sambhar) हा पदार्थ बहुतांश भारतीयांच्या आवडीचा. मस्त गरमागरम लुसलुशीत इडल्या आणि त्याच्या जोडीला आंबट- गोड- तिखट चवीचं चमचमीत सांबार असलं मी मग काही अडचणच नसते. नाश्ता म्हणून हा पदार्थ जसा खाल्ला जातो, तसाच रात्रीचं जेवण म्हणूनही अनेकांना चालतो. कारण पचायला अतिशय हलका आणि अत्यंत चवदार. अशा या चवदार पदार्थाच्या (tasty food) प्रेमात कोणी नाही पडला तरच नवलं. या एका विदेशी व्यक्तीचंही तसंच झालं. (Tasty sambhar recipe by a Foreigner)

 

मागे एकदा भारतात आल्यानंतर त्याने इडली- सांबार खाऊन पाहिलं. ते त्याला खूपच आवडलं. तो ते कसं करायचा ते शिकला आणि मग त्याने त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला. जेक ड्रायन (JAKE DRYAN) असं या व्यक्तीचं नाव. तो शेफ असावा किंवा मग त्याला विविध खाद्यपदार्थ बनविण्याचा छंद असावा, असं त्याच्या इन्स्टाग्राम पेजवरून (instagram share) दिसून येतं. कारण त्यानं आजवर अनेक पदार्थांच्या रेसिपी शेअर केल्या असून त्या चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यात भारतीय पदार्थांचं प्रमाणही भरपूर आहे. आता आपण आपल्या पद्धतीने नेहमीच सांबार करतो. पण तो नेमकी कोणती रेसिपी शिकलाय आणि ती कशी आहे, हे जाणून घेण्याची उत्सूकता अनेक खाद्यप्रेमींमध्ये आहेच. शिवाय एक परदेशी व्यक्ती सांबार बनवतेय म्हटल्यावर आणखीनच उत्सूकता वाढते. म्हणूनच तर बघा ही जेक स्पेशल सांबार रेसिपी.

 

जेक ड्रायनने कसं केलं सांबार...- सगळ्यात आधी तर त्याने तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्यात थोडं मीठ, हिंग आणि हळद टाकून ती शिजवून घेतली.- त्यानंतर एका कढईत त्याने तेल गरम केलं. त्यात जिरे, मोहरी, हिंग टाकून फोडणी करून घेतली.

झटपट चमचमीत पनीर मसाला करा घरीच ; चव हॉटेलपेक्षा भारी- आणि रेसिपी सुपरफास्ट - फोडणी झाल्यानंतर चिरलेला कांदा टाकून परतून घेतला. त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून त्या ही परतल्या. यानंतर त्याला आवडतात त्या सगळ्या भाज्या टाकल्या.- भाज्यांना वाफ आल्यावर त्यात त्याने पाणी टाकलं. लाल तिखट, सांबार मसाला आणि चवीनुसार मीठही टाकलं.- पाण्याला उकळी आल्यावर त्याने त्यात शिजवलेली तूर डाळ टाकली. सगळं मिश्रण एकत्र केलं आणि चांगलं उकळून घेतलं.

रशियन तरुणीनं लाटले आलू के पराठे, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स म्हणाले, पराठे बेलना..- अशा पद्धतीने त्याने चटपटीत सांबार केलं. ते जरा घट्ट झालं आहे, पुढच्या वेळी थोडं पातळ करेन, असंही त्याने प्रांजळपणे कबूल केलं. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरलइन्स्टाग्रामकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.